विरामचिन्हे व त्यांचे प्रकार | Marathi Viram Chinh List with Examples

Punctuation in Marathi

मराठी विरामचिन्हे व त्यांची नावे

अनेक विद्यार्थ्यांना विरामचिन्हे म्हणजे काय? हा प्रश्न पडत असेल .तर विराम म्हणजे थांबणे आणि वाक्यात वाक्य थांबून साठी वापरले जाणारे चिन्हांना विरामचिन्हे म्हणतात. आपण जेव्हा मराठी भाषा मध्ये वाक्य लिहिण्यास सुरुवात करतो तेव्हा ते वाक्य कुठे संपले हे समजून साठी विराम चिन्हांचा वापर केला जातो. जेव्हा आपण लेखन करत असतो तेव्हा कुठेतरी आपण विराम घेत असतो आणि त्या विराम साठी चिन्हं वापरत असतो हे चिन्ह म्हणजे विराम चिन्ह होय. इंग्रजीमध्ये विरामचिन्हे आला Punctuation Mark असे म्हणतात.

MPSC ची परिक्षा असो किंवा अन्य कोणती स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासक्रमामधील विरामचिन्हे व त्यांचे प्रकार याचा अभ्यास काय असतो ते खाली समजून घेणार आहोत. या लेखामध्ये आपण विरामचिन्हे व त्यांचे प्रकार उदाहरणासह समजून घेणार आहोत.

विरामचिन्हे व त्यांचे प्रकार (Types of Viram Chinh in Marathi)

१) पूर्णविराम (.)

अ) केवल, संयुक्त व मिश्र वाक्य ज्या ठिकाणी संपते त्या ठिकाणी संपते, त्या ठिकाणी पूर्णविराम देतात.

 • उदा. सचिन क्रिकेट खेळतो.

ब) शब्दांच्या संक्षिप्तकरणासाठी आद्याक्षरापुढे पूर्णविराम देतात.

 • उदा. भा.प्र.से. (भारतीय प्रशाकीय सेवा)

२) स्वल्पविराम (,)

अ) वाक्यात थोडेच थांबयचे असेल किंवा नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद इ. एकाच जातीचे अनेक शब्द किंवा अनेक वाक्य असल्या स्वल्पविराम वापरतात.

 • उदा. हुशार, जिद्दी, चिकाटी व मेहनती विद्यार्थी यशस्वी होतात.

ब) संबोधन दर्शनासाठी स्वल्पविराम वापरतात.

 • उदा. जगदीश, इकडे ये.

३) अर्धविराम (;)

अ) एखादा विचार पूर्ण होत असेल; परंतु वाक्य पूर्ण होत नसेल त्या ठिकाणी अर्धविराम वापरतात.

 • हेमंत खूप खेळला; पण त्याला गाडी सापडले नाही.

4) अवतरण चिन्ह (‘—-‘ / “—-“)

अ) एका त्याचे बोलणे किंवा वाक्य महत्त्वाचे असेल, तर त्या ठिकाणी दुहेरी अवतरण चिन्ह वापरतात.

 • उदा. स्वामी विवेकानंद म्हणजे, “उठा, जागे व्हा.”

ब) वाक्यात जर एखाद्या विशिष्ट शब्दाला महत्व द्यायचे असेल, तर एकेरी अवतरण चिन्ह वापरतात.

 • उदा. मुल ध्वनीना ‘वर्ण’असे म्हणतात.

५) प्रश्नचिन्ह (?)

या चिन्हाचा उपयोग प्रश्न विचारण्यासाठी किंवा चौकशी करण्यासाठी करतात.

 • उदा. तुमचं नाव काय? तुम्ही कुठून आलात?

६) उदगार चिन्ह (!)

एखादी भावना उत्स्फूर्तपणे व्यक्त होताना जे शब्द बाहेर पडतात, त्या शब्दाच्या शेवटी आणि उद्गार वाचक वाक्याच्या शेवटी या चिन्हाचा उपयोग करतात.

 • उदा. शब्बास ! तू खूप चांगलं काम केलं.
 • उदा. बापरे! एवढा मोठा साप!

७) संयोग चिन्ह (-)

वाक्य लिहिताना एखादा शब्द आपण लिहिला गेल्यास तो पुढील ओळीत पूर्ण करण्यासाठी तसेच दोन शब्द जोडण्यासाठी सेवा चिन्हाचा वापर करतात.

 • उदा. राजा-राणी, गुण-दोष.

८) अपूर्ण विराम (:)

एखाद्या गोष्टीचा खुलासा करण्यासाठी काही उदाहरणे किंवा दाखला देण्यासाठी या चिन्हाचा उपयोग करतात.

 • उदा. पुढे क्रमांकाच्या विद्यार्थी उभे रहा: १२,१४,१८,३४

९) कंस ( )

एखाद्या शब्दाला अर्थ लिहिण्यासाठी किंवा त्याचा समानार्थी शब्द दाखवण्यासाठी ‘कंस’ वापर करतात.

 • उदा. चोराला दंड (शिक्षा) ठोठावण्यात आला.