1000+ मराठी वाक्यप्रचार व त्यांचे अर्थ PDF | Vakprachar in Marathi with Meaning PDF

Marathi Vakprachar with Meaning

नमस्कार मित्रांनो, आपले pdfmaterial या ब्लॉग वर खूप खूप स्वागत आहे या ब्लॉग वर तुम्हाला खूप सारे साहित्य PDF स्वरूपात मिळतील. तर आज आपण या पोस्टमध्ये १०००+ मराठी वाक्प्रचार व त्यांचे अर्थ (Vakprachar in Marathi with Meaning) या विषयाबद्दल जाणून घेणार आहोत तसेच आम्ही सगळे वाक्यप्रचार PDF स्वरूपात दिली आहे.

वाक्यप्रचार म्हणजे काय?

वाक्यप्रचार हा असा शब्दाचा समूह असतो की शब्दाचा असलेल्या अर्थापेक्षा वेगळा अर्थ प्राप्त झाला त्यालाच वाक्प्रचार असे म्हणतात.

मित्रांनो, वाक्यप्रचार हे मराठी व्याकरणातील एक घटक आहे आणि या घटकावर ते स्पर्धा परीक्षा जसे की MPSC, Talathi, Police Bharti, Gram Sevak Bharti आणि बरेच परीक्षांमध्ये हमखास प्रश्न असतात.

100+ Vakprachar in Marathi List with Meaning and Sentence

झुंजूमुंजू होणेपहाट होणे
छक्केपंजे करणेलबाडीने डावपेच खेळणे
घोडे पुढे दामटनेआपलेच म्हणणे खरे करणे
उन्मळून पडणेमुळासकट कोसळणे
आकांडतांडव करणेरागाने आदळआपट करणे
फक्त होणेविजय होणे
बांगडी फुटणेवैधव्य येणे
माया पातळ करणेप्रेमात घट होणे
अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणेथोड्याशा यशाने चढून जाणे
आगीत तेल ओतणेभांडण किंवा वाद विकोपाला जायला असे करणे.
उराशी बाळगणेमनात जतन करून ठेवणे.
उलटी अंबारी हाती येणेभीक मागण्याची पाळी येणे.
आच लागणेझळ लागणे
आपल्या पोळीवर तूप ओढणेदुसर्यांचा मुळीच विचार न करता साधेल तेवढा स्वतःचा फायदा करून घेणे.
आभाळ कोसळणेएकाएकी फार मोठे संकट येणे
विकास चा डोंगर तिकडे करणेफार मोठे अवघड कार्य पार पाडणे
उखळ पांढरे होणेपुष्कळ फायदा होणे
तोंडचे पाणी पळणेअतिशय घाबरणे
जीव मेटाकुटीस येणेत्रासाने अगदी कंटाळून जाणे
उखाळ्या-पाखाळ्या काढणेएकमेकांचे उणेदुणे काढणे किंवा दोष देणे.
उचलबांगडी करणेएखाद्याला जबरदस्तीने हलवणे.
तारांबळ उडणेअतिशय घाई होणे.
जिवाचे रान करणेखूप कष्ट सोसणे
तळपायाची आग मस्तकातजाणे अतिशय संताप होणे
हाय खाणेधास्ती खाणे
साक्षर होणेलिहिता-वाचता येणे
हात दाखवणेइंगा दाखवणे
साक्षात्कार होणेखरेखुरे स्वस्वरू कळणे
उदक सोडणेएखाद्या वस्तूवरील आपला हक्क सोडून देणे
उध्वस्त होणेनाश पावणे
आकाश ठेंगणे होणेअतिशय आनंद होणे
उन्हाची लाही फुटणेअतिशय कडक ऊन पडणे
हलू देणेचकवणे
हात धुवून मागे लागणेचिकाटीने एखाद्या गोष्टीच्या मागे लागणे
हाता पाया पडणेगयावया करणे
थांग न लागणेकल्पना न करणे
तोंडावाटे ब्र न काढणेएकही शब्द न बोलणे
चौदावे रत्न दाखवणेमार देणे
जमीनदोस्त होणेपूर्णपणे नष्ट होणे
हातावर शिर घेणेजीवावर उदार होणे किंवा प्राणाची पर्वा न करणे
हाताला हात लावणेथोडीदेखील मेहनत न घेता फुकटचे श्रेय घेणे
जंग जंग पछाडलेकमालीचे प्रयत्न करणे
अत्तराचे दिवे लावणेउधळपट्टी करणे
जीव अधीर होणेउतावीळ होणे
आकाश पाताळ एक करणेफार मोठ्याने आरडाओरडा करुन थैमान घालने.