सर्वनाम मराठी त्याची व्याख्या व प्रकार – Sarvanam in Marathi

Sarvanam in Marathi Examples

सर्वनाम (Saravana in Marathi) – नामा ऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दांना सर्वनाम असे म्हणतात. नामाची पुनरावृत्ती टाळणे हे सर्वनामाचे कार्य होय.

Sarvanam Defination in Marathi

सर्वनामांना स्वतःचा अर्थ नसतो. ती ज्या नामासाठी वापरले जातात, त्यांचाच अर्थ सर्वनामाना प्राप्त होतो. सर्वनामांचा वापर सर्व प्रकारच्या नामांसाठी होतो; म्हणून त्यांना सर्वनामे असे म्हणतात. सर्वनामांना प्रतिनामे असेसुद्धा म्हणतात. सर्वनाम हे नामाप्रमाणे लिंग, वचन, विभक्ती यानुसार बदलते.

सर्वनाम (Sarvnam in Marathi) – या घटकाचे महत्त्व स्पर्धा परीक्षा करणारया विद्यार्थ्यांमध्ये जास्त आहे कारण की MPSC व सरळ सेवा या परीक्षांच्या अभ्यासक्रमात मराठी व्याकरण मधील सर्वनाम हा घटक समाविष्ट आहे. या टॉपिक वर एक ते दोन Question हमखास येतात. त्यामुळे या टॉपिक चे महत्त्व वाढते. हे टॉपिक नीट अभ्यास केल्यास चांगले मार्क देऊ शकतो. या लेखामध्ये व्याख्या, प्रकार, Example दिलेले आहेत. जे की मागील वर्षाच्या प्रश्पत्रिकेत आलेले आहेत त्याचा फायदा तुमच्या अभ्यासात होईल. चला तर मग जाणुया सर्वनाम बद्दल संपूर्ण माहिती त्याच प्रकार, एकुण सर्वनामे, उदाहरण इ. 

सर्वनामे (Sarvanam in Marathi)

मराठीत एकूण सर्वनामे 9 आहेत ते खालीप्रमाणे :

मी तूतो/ ती/ त्या/ तेजो/ जी/ जे.हा/ हे/ ही.
कोणआपणकाय स्वतः

सर्वनामांचे प्रकार (Sarvanamache Prakar)

सर्वनामांचे खालील सहा प्रकार पडतात :

1) पुरुषवाचक सर्वनाम

व्याकरणात पुरुष ही संकल्पना व्यापक आहे. हे मानवजातीतील नर असा त्याचा अर्थ होत नाही, तर मूर्त किंवा अमूर्त अशा कोणत्याही घटकाचा यात समावेश होतो. प्रथम व द्वितीय पुरुषी सर्वनामे लिंगानुसार बदलत नाही. फक्त तृतीयपुरुषी सर्वनामे मात्र बदलतात. 

A) प्रथम पुरुषवाचक सर्वनाम: बोलणारा स्वतःचा उल्लेख करताना स्वतःच्या नामाऐवजी वापरतो. उदा. मी, आम्ही, आपण, स्वत:

 • मी उद्या गावाला जाणार आहे
 • आपण सहलीला जाऊ
 • आम्ही तुला मदत करू
 • स्वतः खात्री करून घेतो

B) द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम: समोरच्या व्यक्तीचे नाव न घेता तिच्यासाठी जे नाम वापरले जाते.

उदा. तू, तुम्ही, आपण, स्वतः इत्यादी.

 • तू एवढा लाडू खाऊन टाक
 • तुम्ही एवढे काम कराच
 • आपण आलात बरे वाटले
 • स्वतःऊन आलात हे बरे झाले !

C) तृतीय पुरुषवाचक सर्वनाम : ज्याच्याबद्दल बोलायचे किंवा लिहायचे त्याचा उल्लेख करणाऱ्या सर्वांना तृतीयपुरुषी म्हणतात.

उदा. तो, तिथे, त्या, ते.

 • तो म्हणे आजारी होता.
 • तो अतिशय सुंदर होता.

महत्वाचे : आपण किंवा स्वतः चा वापर स्वतःच्या नावाऐवजी केल्यास ते प्रथम पुरुषवाचक, समोरच्या व्यक्तीच्या नावाऐवजी केल्यास द्वितीय पुरुष वाचक, तर तिसऱ्या व्यक्तीसाठी केल्यास तृतीय पुरुष वाचक.

2) दर्शक सर्वनाम :

हे, हा, हया, ही, तो, ती, ते, त्या चा वापर नामाऐवजी केल्यास त्या नामाचा निर्देश होत असेल तर ती दर्शक सर्वनामे आहेत. दर्शक सर्वनाम होण्यासाठी वरील शब्द कर्ता म्हणून वापरावे लागतात. वाक्या ज्याच्या बद्दल माहिती सांगते तो वाक्याचा कर्ता असतो. परंतु कर्तापूर्वी वापरले तर ते दर्शक विशेषणे असतात.:

उदा.

दर्शक सर्वनामेदर्शक विशेषणे
ते चार लाख मुलगी आहेती मुलगी चालाक आहे
तो काळा मुलगा आहेतो मुलगा काळा आहे
हा रानटी हत्ती आहेहा हत्ती रानटी आहे आहे

3) संबंधी सर्वनामे

गौण वाक्यातील जो, जि, ज्या, जी हे सर्वनाम आहे कारण ते मुख्य वाक्यातील तो, ती, ते, त्या संबंध दाखवतात. संबंधी सर्वनाम अनुसंबंध सर्वनामे असेसुद्धा म्हणतात.

उदाहरणार्थ,

 • जे पेरावे ते उगवते
 • जे चकाकते, ते सोने नसते.
 • गर्जेल, तो करील काय ? 
 • जो करेल तो भरेल
 • ज्याने हे भांडण उकरले तो माघार घेईल.

महत्वाचे : जि, जी, जे, ज्या यासंबंधी सर्वनामाने जोडलेली वाक्य मिश्र वाक्य असतात. सर्वनाम असणारे वाक्य असते तर त्यांना जोडून येणारे वाक्य मुख्य वाक्य असते.

4) प्रश्नार्थक सर्वनाम

एखादा नामाला प्रश्न विचारण्यासाठी विचारलेल्या प्रश्न सूचक शब्दाला प्रश्नार्थक सर्वनामे म्हणतात. कोण उदा. काय, कोणास, कुणाला, कोणी.

प्रश्नार्थक सर्वनाम इतर अर्थाने वापर

 • कोण हे सर्वनाम प्रामुख्याने प्राण्यासाठी व मनुष्य साठी वापरतात तर काय हे सर्वांना सर्वनाम बहुदा सूक्ष्म प्राणी निर्जीव वस्तूंसाठी वापरतात
 • उदा. कोणी मारला हा दिर
 • त्याने पत्रात काय लिहिले आहे
 • विलक्षणपणा किंवा आश्चय दाखवण्यासाठी
 • तुच्छता तिरस्कार दाखवताना
 • दोन गोष्टी तील फरक दाखवण्यासाठी

महत्वाचे : प्रश्नार्थक सर्वनामा मध्ये वाक्याच्या शेवटी प्रश्नार्थक चिन्ह असते.

5) सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम

कोण किंवा काय या शब्दांचा वापर प्रश्न विचारण्यासाठी न करता ती कोणत्या नामासाठी वापरले आहेत हे निश्चितपणे सांगता येत नसेल तर ते सामान्य सर्व नामे असतात.

 • कोण ही गर्दी
 • कोणी कोणास काय म्हणावे
 • माझ्या मुठीत काय ते सांग पाहू
 • कोणी प्रेमळतर कोणी कपटी
 • कोणीही यावे टिकली मारून जावे

6) आत्मवाचक सर्वनाम

आपण, स्वतः, नीज या सर्वनामांचा वापर करता नंतर केल्यास त्याचा अर्थ स्वतः असा होतो त्यामुळे ते आत्मवाचक सर्वनाम होतात.

 • मी स्वतः त्याला पाहिले
 • स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही
 • स्वतःला टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही
 • तो आपण होऊन माझ्याकडे आला
 • पक्षी निजबाळांसह बागडती
 • तो स्वतः राहशील का ?

महत्वाचे : फक्त आपण या शब्दाची जात विचारल्यास पुरुष वाचक सांगावे , ती स्वतः शब्द चे विचारलास ते आत्मवाचक सांगावे.

Note

सर्वनामांचे लिंगानुसार होणारे बदल एकूण तीन आहे.

 • हा
 • तो
 • जो

लिंगानुसार सर्वनामांचा पाच सर्वनामे वचननुसार बदलतात.

 • मी /आम्ही
 • तो /तुम्ही
 • हा
 • तो
 • जो

महत्वाचे : सर्वनामांचा विभक्ति विचार सर्वनाम या नामाच्या ऐवजी येत असल्याने ते नामांना विभक्तीचे प्रत्यय लागतात तेच सर्व नामाने लागतात. सर्वनामांना हाक मारता येत नाही म्हणून त्यांची संबोधन विभक्ती होत नाही.

मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकेत आलेले प्रश्न

1) ज्याच्या हाती ससा तो पारधी यामध्ये असलेले सर्वनामे कोणत्या प्रकारचे आहेत?

 • संबंधी व दर्शक

2)आत्मवाचक सर्वनाम असलेले वाक्य ओळखा?

 • तो आपण होऊन पोलिसांच्या स्वाधीन झाला.

3) मराठी प्रमुख सर्वनामे किती?

 • नऊ 

4)सर्वनामाचे लिंगानुसार बदलणारे सर्वनामे किती?

 • तीन

5)वचनानुसार बदलणारे सर्वनामे किती?

 • पाच

6) कोणी कोणी सर्वनामांचा प्रकार ओळखा?

 • अनिश्चित सर्वनाम

7) लोकांना आपण होऊन श्रमदान केले सर्वनामांचा प्रकार ओळखा ?

 • आत्मवाचक सर्वनाम

8) सर्वनाम?

 • हे नामा ऐवजी येथे

9) आपण चांगले वागलो तर समाज चांगला वागेल या अधोरेखित सर्वनामांचा प्रकार ओळखा ?

 • आत्मवाचक

10) जो अभ्यास करतो तो यशस्वी होतो सर्वनामांचा प्रकार ओळखा?

 • संबंधित सर्वनाम.