रेशन कार्ड (शिधापत्रिका) – Ration Card Maharashtra in Marathi

Ration Card Maharashtra in Marathi

Ration Card Maharashtra in Marathi: नमस्कार मित्रांनो, आज या लेखा मध्ये नवीन रेशन कार्ड काढण्यासाठी ऑनलाईन फॉर्म कसे भरावे, रेशन कार्ड चे प्रकार, त्यासाठी लागणारी कागदपत्रे आणि प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत.

नवीन रेशकार्ड काढण्यासाठीसाठी लागणारे कागदपत्रे: 

 • ओळखीचा पुरावा:
 • Pan card/आधार कार्ड/अर्जदाराच्चा फोटो RSVY कार्ड (Anyone)
 • पत्त्याचा पुरावा:
 • 7/12 आणि 8 अ चा उतारा/ वीज बिल/ टॅक्स पावती (Anyone)
 • वयाचा पुरावा:
 • जन्माचा दाखला/ प्राथमिक शाळाचा प्रवेशाचा उतारा.
 • उत्पन्न दाखला:
 • आयकर विवरण पत्र / सरकार ऑफिसरचा पडताळणी अहवाल/ वेतन मिळत मिळत असल्यास FROM16 / उत्पन्न दाखला /निवृत्तीवेतन धारकांच्या बँकेचे प्रमाणपत्र.

दुबार रेशन कार्ड मिळवण्यासाठी आवश्यक कागदपत्रे:

तुमच्या रेशन कार्ड जर हरवले असेल किंवा पूर्णपणे फाटलेली असेल तर त्यासाठी आवश्यक असलेले कागदपत्रे खालील प्रमाणे आहेत.

 • रेशन कार्ड हरवल्या बाबतचा पोलिसांचा दाखला
 • अर्जासोबत ओळखपत्र पुरावा
 • कार्ड खूप जुने झाले असतील व त्यावरील अक्षरे पुसट झाली असतील तर साध्या कागदावरील स्वघोषणापत्र आवश्यक
 • रेशन कार्ड जीर्ण झाले असेल तर मूळ जिल्हा कागदावर दुकानदाराचे सही व शिक्का असणे गरजेचे आहे

रेशन कार्ड मध्ये नवीन नाव नोंदणी साठी आवश्यक कागदपत्रे:

 • त्या संबंधित अर्ज
 • नाव लहान मुलांचे नाव वाढवण्यासाठी किंवा नोंदणी झाली मुलांचे जन्माचे दाखले तुमच्या शाळेतील बोनाफाईड सर्टिफिकेट त्यांचे प्रत
 • मोठया व्यक्तींचे नाव वाढवण्यासाठी प्रवीणच्या कार्डातून नाव कमी केल्याबद्दल दाखला
 • पत्नीचे नाव वाढवण्यासाठी माहेरचा कार्डातून नाव कमी केल्या बाबत तहसीलदार किंवा परिमंडळ अधिकारी यांचा दाखला तसेच मॅरेज सर्टिफिकेट आवश्यक आहे

रेशन कार्ड मधून नाव कमी करावयाचे असल्यास आवश्यक कागदपत्रे:

 • संबंधित एक अर्ज
 • मृत्यू झाल्यास मृत्यू दाखला
 • मुलींचे लग्न झाल्यास लग्नपत्रिका जोडून मुलींचे नाव कमी कमी करता येते
 • परगावी राहण्यास जात असल्यास  जात असल्यास पहिले मूळ कार्ड व नाव कमी करण्याचा अर्ज
 • या अर्जासोबत ओळखपत्र पुरावा जोडणे आवश्यक आहे.

नवीन रेशन कार्ड साठी ऑनलाइन फॉर्म कसे भरावे:(How To Apply Online Form for Ration Card Maharashtra)

महाराष्ट्र शासन तीन प्रकारचे रेशन कार्ड उपलब्ध करून देते त्यामध्ये पिवळे रेशन कार्ड, केशरी रेशन कार्ड आणि पांढरे रेशन कार्ड हे तीन कार्ड आहेत. pratek प्रकारचा रेशन कार्ड साठी वेगवेगळे नियम आहेत. नवीन रेशन कार्ड काढण्यासाठी अगोदर Offline Process असायचे व कागदपत्रे सादर करावे लागत असे पण आता सरकारच्या नव्या नियमानुसार ऑनलाइन(Online) देखील नवीन रेशन कार्ड काढू शकता, te Step By Step पाहणार आहोत.

 • प्रथमता, ऑफिशिअल वेबसाईट www.mahafood.gov.in वेबसाईट ला bhet dyavi.
 • त्यामधील ऑनलाईन सेवा यातील पाचवा ऑप्शन ऑनलाईन शिधापत्रिका प्रणाली या ऑप्शन मधून सिलेक्ट करावे.
 • हे स्टेप महत्त्वाचे आहे PUBLIC LOGIN व GOVERNMENT LOGIN दोन ऑप्शन असतात तर तिथे आपण पब्लिक असल्याकारणाने PUBLIC LOGIN क्लिक करा.
 • आपल्याकडे रेशन कार्ड नाही आहे म्हणून New Ration Card वर सिलेक्ट करणे. आपण नवीन शिधापत्रिका काढत आहोत त्यामुळे New Ration Card वर क्लिक करून पुढे जावे. यामधील एक गोष्ट लक्षात ठेवावे ते म्हणजे जी व्यक्ती किंवा अर्जदार अर्ज करणार आहे, त्या घरातील महिला अठरा वर्षांपेक्षा जास्त वय असेल तर, त्या महिलेनेच अर्ज करावा नाहीतर पुरुषांनी अर्ज करावा.
 • अशाप्रकारे सर्व माहिती भरल्यानंतर सक्सेसफुली तुमच्या रेशन कार्ड रजिस्ट्रेशन होऊन जाईल व सर्वात शेवटी रजिस्ट्रेशन Successfully झाली आहे का नाही हे पाहावे.

म्हणून अगदी सरळ टप्पात तुम्ही रेशन कार्ड साठी अर्ज करू शकता, व त्या संबंधित माहिती घेऊ शकता.

शिधापत्रिका चे तीन प्रकार आहेत

महाराष्ट्र शासनाने 5 मे 1999 रोजी तिहेरी रेशन कार्ड योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत महाराष्ट्र तीन प्रकारचे रंगाचे रेशन कार्ड वितरित केले जातात. प्रत्येक रंगाच्या रेशन कार्ड साठी वेगवेगळे नियम व अटी आहेत. या तिहेरी रेशन कार्ड म्हणजे पिवळे, केशरी,पांढरा रेशन कार्ड होय या संबंधित नियम खालील प्रमाणे आहेत.

पिवळी रेशन कार्ड : कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 15000 च्या मर्यादित असले पाहिजे.

IRDP योजनेअंतर्गत 1997-98 यादीत नाव असणे समाविष्ट असणे.

केसरी रेशन कार्ड: कुटुंबाचे उत्पन्न 15000 पेक्षा जास्त एक लाखाच्या आत मर्यादित असावे,

त्याप्रमाणेच चार हेक्टर पेक्षा जास्त जमीन नसावी किंवा बागायती जमीन नसावी.

पांढरे रेशन कार्ड: यामध्ये कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा जास्त असल्यास रेशनकार्ड वितरीत केले जाते.

प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना (मार्च 2020)

संपूर्ण जगात कोरना काळात खूप मोठी आर्थिक संकट ओढवले होते, त्यामध्ये त्यांचे हातावर पोट आहे त्या लोकांच्या पोटापाण्याचा खाण्यापिण्याचा खूप गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. तर प्रत्येक देशाने त्यांच्यासाठी काही ना काही आर्थिक पाठबळ किंवा स्वस्त धान्य वितरित केले. त्याप्रमाणेच भारत सरकारने प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना अंतर्गत देशातील गरीब जनतेला दोन रुपये दराने गहू उपलब्ध करून दिले तीन रुपये दराने तांदूळ उपलब्ध करून दिले. योजना 30 मार्च 2020 मध्ये सुरू करण्यात आले, यामध्ये एका व्यक्तीला पाच किलो धान्य उपलब्ध करून देण्याचा शासनाचा उद्देश होता. शासनाच्य पुरविला जाणारा या योजनेचा लाभ महाराष्ट्रातील गरीब लोकंहि घेऊ शकतात त्यामुळे त्यांचे जीवन सुखकर होईल.

Mera Ration App:

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या द्वारे One Nation One Ration Card योजना सुरू करण्यात आले. देशातील प्रवासी कामगार वर्ग आहे त्यांच्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली One Nation One Ration Card भारत सरकारच्या खाद्य वितरण मंत्रालयांतर्गत मोबाईल मध्ये Mera Ration App देखील लाँच करण्यात आले. Application श्रमिक कामगार वर्ग आहे, जे लोक एका राज्यातून दुसऱ्या राज्यात कामासाठी बाहेर पडतात त्या कामगारांसाठी हे Mera Ration App खूप उपयोगी आहे.

रेशन दुकानातील धान्य दर:

रेशन दुकानात खालील प्रमाणे स्वस्त दरात धान्य वितरीत केले जाते. रेशन दुकानत खालील दराप्रमाणे जर धान्य मिळत नसेल किंवा जादा रक्कम घेऊन धान्य देत असेल, रेशन दुकानदार रेशन मालाचे पावती देत नसल्यास, स्थाnik पोलीस चौकी मध्ये तक्रार दाखल करावी.

 • गहू : 2 रुपये
 • तांदूळ : 3 रुपये
 • साखर : 20 रुपये
 • उडीद डाळ : 40 रुपये
 • तुर दाळ : 45 रुपये

रेशन न दिल्यास कुठे तक्रार दाखल करावी?

कोणत्या रेशन कार्ड धारकांना धान्य मिळण्यास अडचणी येत असेल तर जिल्हा अन्न व पुरवठा नियंत्रक कार्यालय किंवा राज्य ग्राहक सहाय्यक केंद्रावर तुम्ही तक्रार दाखल करू शकता. यासाठी सरकारने टोल फ्री नंबर देखील उपलब्ध करून दिलेला आहे. यामध्ये 1967 टोल फ्री क्रमांक (Toll Free Number) उपलब्ध आहेत, तसेच 1800-180-2087,1800202-5512 दूरध्वनी क्रमांक दूरध्वनी क्रमांक उपलब्ध करून दिलेले आहेत.