नॉन क्रिमीलेअर म्हणजे काय? Non Creamy Layer Certificate Meaning in Marathi

नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र काढण्यासाठी लागणारी कागदपत्रे

Non Creamy Layer Certificate Documents in Marathi

नमस्कार मित्रांनो, आपण आज या लेखामध्ये नॉन क्रिमीलेअर म्हणजे काय? (Non Creamy Layer Certificate Meaning in Marathi) याबद्दल जाणून घेणार आहोत. हे प्रमाणपत्र इतर मागास प्रवर्ग (OBC) व शैक्षणिक व सामाजिक दृष्ट्या मागास प्रवर्ग (ESBC) विद्यार्थ्यांना आरक्षणचा लाभ घेण्यासाठी गरज भासते. आम्ही या लेखांमधून नॉन क्रिमीलेअर काढण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे, नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र कसे काढावे याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

नॉन क्रीमी लेयर सर्टिफिकेट मराठी अर्थ

महाराष्ट्र राज्यातील इतर मागास प्रवर्ग (OBC), भटक्या विमुक्त जाती जमाती (VJNT) आणि विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासकीय, निमशासकीय, शासन अनुदानित संस्थेच्या प्रवेशात आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक असते. जर विद्यार्थ्यांकडे नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र नसेल तर त्यांना कोणत्याही आरक्षणाचा लाभ घेता येत नाही. विद्यार्थ्यांनी आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्रासाठी अर्ज करावे. नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र फक्त एका वर्षासाठी ग्राह्य धरण्यात येते ते दरवर्षी रिन्यू करावे लागते. विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या प्रवेशासाठी नॉन क्रिमीलेअर ची मर्यादा राज्य सरकारने साडेचार लाख रुपयांवरून सहा लाख रुपये करण्याचा निर्णय घेतला आहे. याचा अर्थ असा की ज्यांचे उत्पन्न मागील सलग तीन वर्षात सहा लाखापेक्षा अधिक आहे त्यांना आरक्षणाचा लाभ मिळणार नाही.

नॉन क्रिमिनल काढण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे

मित्रांनो जर तुम्हाला नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र काढायची असेल तर खाली दिलेले कागदपत्रे आवशक्य आहेत. हे प्रमाणपत्र तुम्ही महा-ई-सेवा केंद्रात काढून घेऊ शकता, ही सेवा ऑनलाइन उपलब्ध आहे.

  • मागील तीन वर्षाचा तहसीलदार उत्पन्न दाखला
  • जातीच्या ड दाखल्याची प्रत
  • रेशन कार्ड प्रत
  • आधार कार्ड प्रत
  • घर पत्रक उतारा
  • फोटो
  • शाळा सोडल्याचा दाखला

How to Apply Non Creamy Layer Certificate Online Maharashtra?

Applicants who is applicable for Non Creamy Layer Certificate can get their certificate through online and offline process. In Maharashtra there is Maha-E-Seva Kendra are available through out the Maharashtra, simply you can visit the store and complete the registration process.