मृत्युंजय कादंबरी PDF – Mritunjay Book PDF Download in Marathi by Shivaji Sawant

Mritunjay Kadambri in Marathi PDF

Mritunjay Book PDF- आपण आज शिवाजी सावंत लिखित मृत्युंजय या पुस्तकांचे परीक्षण करणार आहोत. तुम्हाला प्रश्न पडू शकतो की आम्ही याच पुस्तकाचे परीक्षण का करतोय? तर याचे उत्तर अगदी सरळ आहे ते म्हणजे जगात google वर जरी search केलात की जगातील सर्वोत्कृष्ट दहा मराठी पुस्तके कोणती आहेत तर त्यामध्ये या पुस्तकाचे नाव येतो तर मग याबद्दल परीक्षण का करू नये, असा प्रश्न पडला त्यामुळेच शिवाजी सावंत लिखित मृत्युंजय या पुस्तकाचे सविस्तर परीक्षण या लेखात करणार आहोत. तुम्ही खाली दिलेल्या लिंक वरून मृत्युंजय हे कादंबरी मोफत डाऊनलोड करू शकता ते पीडीएफच्या स्वरूपात उपलब्ध करून दिलेला आहे.

कादंबरीला मिळालेले पुरस्कार: (AWARD)

या कादंबरीला भारतीय ज्ञानपीठचा 1986 सालचा मूर्तीदेवी पुरस्कार जाहीर झाला आहे. त्याचबरोबर देशभरातून विविध पुरस्कार प्राप्त झाले आणि ज्यांनी या पुस्तकांचे भाषांतराने केलेला लेखकांना देखील विविध पुरस्कार जाहीर झाले, या पुस्तकांचे माहिती जाणून घेण्याअगोदर लेखकाविषयी थोडीफार माहिती जाणून घेऊया, जेणेकरून त्या लेखकाचा लेखनाचा कसपार्श्वभूमी समजून घेण्यास मदत होईल.

लेखकाची पार्श्वभूमी: (Background)

शिवाजी सावंत हे लेखक मूळचे कोल्हापूरचे. कोल्हापुरातच वीस वर्षे ते प्राध्यापक होते, त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाचे लोकपरीक्षण मासिकासाठी देखील सहा वर्षे काम केलेत. माझा भारत म्हणजेच महाभारत हे समीकरण त्यांच्या मनात एकदम पक्के झाले तेव्हा महाभारताचा अभ्यास करण्यास त्यांनी सुरुवात केली. सूर्यपुत्र कर्ण विषयी खूप सखोल अभ्यास करून त्यांचे संदर्भ पुस्तके जमा करून त्यांनी हा मृत्युंजय ग्रंथ लिहिला चला तर मग या पुस्तकाचे मूळ परीक्षणाकडे वळूया.

प्रस्तावना:

या कादंबरीला देखनी कादंबरी असेसुद्धा म्हणतात. त्याला अनेक कारणे असली तरी महत्त्वाचे कारण की पुस्तकात जिवंत भास निर्माण करणारे चित्रे, त्या पुस्तकांचे मुखपृष्ठ अत्यंत सुबक आहे. मुखपृष्ठावर दानवीर सूर्यपुत्र कर्ण याचे दृश्य आहे तर सर्वात शेवटी शिवाजी सावंत यांचा परिचय व त्यांना मिळालेला मूर्तीदेवी पुरस्काराचा फोटो देखील आहे.

मृत्युंजय नाव (Mritunjay Book in Marathi)

मृत्युंजय हे नाव कर्णाच्या जीवन संघर्षाचा असीम प्रतिबिंब आहे हेच दाखवते, मृत्यूच्या महाद्वारात ज्यांनी विजय धुंद अनुभवला तसेच ज्याने मृत्यूवरही विजय मिळवणारा तोच मृत्युंजय.

सारांश: (Summary)

वरकरणी पाहता हे पुस्तक खूप जाड व मोठे वाटत असेल सुद्धा, पण एकदा जर करता ते वाचायला सुरुवात केली तर तंद्री लागते आणि पुस्तकाच्या जाडपणाचा भूत आपोआप डोक्यातून निघून जातो. हे पुस्तक शिवाजी सावंत yabi मायभूमीच्‍या संरक्षणार्थ धारातीर्थ शुर पतन पावणाऱ्या शूरवीरांसाठी अर्पण केलेली आहे. पुस्तकांची प्रस्तावना आणि त्याचा मथळा विचार करण्यासारखा आहे. अर्धदान येथे लेखकांची वाचकाप्रती आणि मदतनिसाप्रती समर्पणाची भावना व्यक्त होते. या पुस्तकाच्या वाचनाचा प्रवास जर आपल्याला सुरुवात करायचा असल्यास तर, आपल्याला थोडी याबद्दल माहिती आहे, हे पुस्तक कर्णाच्या व्यक्तिरेखा बद्दल जरी फिरत असले तरी अनेक व्यक्तिरेखे यामध्ये उघडलेले आहेत. मुळात हे पुस्तक महाभारतातील महत्त्वाच्या व्यक्तींचे स्वगत आहे. याचाच अर्थ या व्यक्तिरेखेला आपल्याच नजरेतून न पाहता श्रीकृष्ण सहित सगळ्यांच्या नजरेतून पाहू शकतो आणि हीच या लेखकाची प्रतिभा आहे.तशा व्यक्तिरेखा बदलतात आपण स्वतःला राहता ती व्यक्ती म्हणून महाभारत आत प्रवेश करतो आणि स्वतःला विसरून कधी कर्ण, दुर्योधन, श्रीकृष्ण तसेच वाचकाला इतकी अच्युत अनुभव या पुस्तकातून येते. शिवाजी सावंत लेखक वाचकाला पूर्णत्व देण्याचा परिपूर्ण प्रयत्न करतात. एकएक स्वगत अत्यंत अर्थपूर्ण व अभ्यासपूर्ण त्यांच्या शैलीमध्ये लिहिली गेली आहे. क्षणाक्षणाला उत्कंठा वाढून नेणाऱ्याकडे त्यांचा कल दिसतो. वाचकाच्या मनातील सूतपुत्र, त्याचा जन्म, कवच कुंडल याची उत्कंठा अगदी शेवटपर्यंत आणली आहे. लेखक विविध पात्रांचा त्यांच्या शरीर रचनेचा, पोशाखाचा, अगदी निर्जीव वस्तू आपल्यासमोर उभा राहतील असा उल्लेख केला आहे. त्यापैकी कवचकुंडलाचा वर्णन विलोभनीय आहे. श्रीकृष्णाच्या स्वगताचा भाग सुद्धा फारच मोहक आहे. वाचकाला पुस्तकाची भाषा जर जड वाटण्याचा संभव आहे, वाचकाला ही भाषा जरी कठीण वाटले तरी तुम्हाला नक्कीच प्रेमात पडेल, त्या भाषेचा वाचकांच्या मनावर इतका परिणाम होतो की, पुस्तक वाचताना दैनंदिन जीवनात असेच घडू लागतात म्हणायचे झाले तर त्या भाषासारखेच आपण बोलू लागतो.

निष्कर्ष:

शब्दरचना सखोल असून वाक्य रचना अतिशय सुंदर आहे, एकूणच हे पुस्तक वाचल्यावर तुमच्या आयुष्यात विशेष बदल घडेल तुम्ही कितीही स्वतंत्र वाटत असला तरीही यामधील पात्रांपैकी तुम्ही स्वतःला जोडण्याचा प्रयत्न करू पाहता, तसेच तुमच्या आयुष्यात नक्कीच सकारात्मक बदल घडेल, तुमच्या आयुष्याबद्दल नवा दृष्टिकोन तुम्हाला सापडेल यात शंका नाही. आपल्याला महाभारतातील आणि गोष्टीचा उलगडा व्हावा यासाठी हे पुस्तक नक्की वाचावे.

Mritunjay Book PDF in Marathi

A direct link is provided below to download Mritunjay Book PDF in Marathi. Following the Download button will redirect you to google drive from there you can download the full in pdf format.

मृत्युंजय हे कादंबरी वाचून झाल्यावर आपल्या अभिप्राय नक्की कळवा.

धन्यवाद.