MPSC PSI Syllabus 2022 PDF In Marathi Download – PSI Exam Information in Marathi

MPSC PSI Syllabus in Marathi PDF Download

आम्ही ह्या लेखांमध्ये MPSC मार्फत होणाऱ्या PSI पदाबद्दल अभ्यासक्रम आणि परीक्षा पद्धत याबद्दल माहिती दिली आहे. या पदासाठी खूप जास्त स्पर्धा असते तरीपण MPSC मार्फत दिलेल्या वेळापत्रकानुसार परीक्षा झाल्या PSI परीक्षा 2022 मध्ये दोन वेळा पूर्व परीक्षा देता येईल तर नवीन विद्यार्थ्यांसाठी आणि जे विद्यार्थी अगोदरपासून तयारी करतात त्या विद्यार्थ्यांसाठी खूप मोठी सुवर्ण संधी आहे. जे विद्यार्थी MPSC नव्याने सुरुवात केली आहेत त्यांना या लेखांमध्ये PSI परीक्षा बद्दल अभ्यासक्रम आणि परीक्षा पद्धत PDF format मध्ये दिलेली आहे. परीक्षेच्या दृष्टिकोनातून  अभ्यासक्रम खूप महत्त्वाचा असतो. या लेखामध्ये दिलेल्या माहिती तुम्हाला उपयुक्त ठरेल.  वेळोवेळी MPSC मार्फत PSI परीक्षा बद्दल अपडेट्स अभ्यासक्रम आणि परीक्षा पद्धत याबद्दल येणारे अपडेट्स या लिंक वर मिळतील.

MPSC PSI Syllabus 2022 OVERVIEW

या लेखामध्ये PSI Exam Process कशी असतील याबद्दल जाणून घेणार आहोत. एमपीएससी 2017 व त्या अगोदर PSI/STI/ASO या तिन्ही पदांसाठी वेगवेगळी परीक्षा घ्यायची पण आता संयुक्त पूर्व परीक्षा या तिन्ही पदांसाठी एकच पूर्व परीक्षा घेते. परंतु त्या परीक्षेचे मुख्य परीक्षा मात्र वेगवेगळी घेतली जाते. जे नवीन विद्यार्थी स्पर्धा परीक्षा क्षेत्राकडे वळलेल्या आहेत व ज्यांना PSI पदाबद्दल सर्व माहिती जाणून घ्यायची आहे तर याबद्दल सविस्तर माहिती या लेखामध्ये दिलेला आहे. ते पुढील प्रमाणे :

MPSC PSI Exam Pattern 2022

१) पूर्व परीक्षा – १०० गुण

२) मुख्य परीक्षा- ४०० गुण

३) शारीरिक चाचणी १०० गुण

४) मुलाखत ४० गुण

संयुक्त पूर्व परीक्षा १०० गुण

विषय (Subject) प्रश्न संख्या एकूण गुण दर्जा माध्यम कालावधी प्रश्नपत्रिकेचे स्वरूप
सामान्य क्षमता चाचणी १०० १०० पदवी मराठी आणि इंग्रजी एक तास वस्तुनिष्ठ बहुपर्यायी

• एकच संयुक्त पूर्व परीक्षा घेण्यात येईल

• प्रत्येक चुकीच्या उत्तरा मागे 25% किंवा वा एकाच्या १/४ एवढे गुण एकूण गुना मधून वजा करण्यात येतील.MP

MPSC PSI Prelims Syllabus 2022

पूर्व परीक्षा मध्ये एकूण सात घटकांचा समावेश होतो तर सविस्तर माहिती खालील प्रमाणे: 

सामान्य क्षमता चाचणी

१) चालू घडामोडी जागतिक तसेच भारतातील.

२) नागरिक शास्त्र – भारताच्या घटनेचा प्राथमिक अभ्यास, राज्य व्यवस्थापन (प्रशासन), ग्राम व्यवस्थापन (प्रशासन)

३) इतिहास – आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास.

४) भूगोल (महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष अभ्यासासह) – पृथ्वी ,जगातील विभाग,  हवामान, अक्षांश- रेखांश ,महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख पिके, शहरे,नद्या, उद्योगधंदे, आदिवासी जमात इत्यादी.

५) अर्थव्यवस्था – भारतीय अर्थव्यवस्था -राष्ट्रीय उत्पन्न, शेती, उद्योग,  परकीय व्यापार,बँकिंग, लोकसंख्या,  दारिद्र्य व बेरोजगारी, मुद्रा आणि राजकोषीय नीति इत्यादी.

शासकीय अर्थव्यवस्था – अर्थसंकल्प, लेखा, लेखापरीक्षण इत्यादी.

६) सामान्य विज्ञान – भौतिकशास्त्र (Physics), रसायन शास्त्र (Chemistry), प्राणिशास्त्र (Zoology), वनस्पतिशास्त्र (Botany), आरोग्यशास्त्र(Hygiene)

७) बुद्धिमापन चाचणी व अंकगणित

बुद्धिमापन चाचणी – उमेदवार किती लवकर व व अचूकपणेपण विचार करू शकतो हे आजमावण्यासाठी प्रश्न.

अंकगणित – बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, दशांश अपूर्णांक व टक्केवारी.

पीएसआय पदाकरिता मुख्य परीक्षेचे टप्पे

MPSC PSI Mains Syllabus 2022

PSI/STI/ASO मुख्य परीक्षा संयुक्त पेपर क्रमांक १ संयुक्तरित्या घेतली जाते आणि संयुक्त पेपर क्रमांक 2 प्रत्येक पदाकरिता वेगवेगळी घेत

पेपर क्रमांक 1 :अभ्यासक्रम सविस्तर पण खालील प्रमाणे दिलेला आहे

१) मराठी – सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी व वाक्यप्रचार यांचा अर्थ आणि उपयोग तसेच उताऱ्यावरील प्रश्नांची उत्तरे.

२) इंग्रजी –  Common Vocabulary, Sentence structure, Grammar, use of Idioms and phrases & thier meaning and comprehension of passage

३) सामान्य ज्ञान – चालू घडामोडी जागतिक तसेच भारतातील.

माहिती अधिकार अधिनियम 2005 व महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015

संगणक व माहिती तंत्रज्ञान- आधुनिक समाजातील संगणकाची भूमिका, वेगवेगळ्या क्षेत्रातील जीवनात संगणकाचा वापर, डाटा कम्युनिकेशन, नेटवर्किंग आणि वेब टेक्नॉलॉजी, सायबर गुन्हे व त्यावरील प्रतिबंध, नवीन उद्योग म्हणून माहिती तंत्रज्ञानाचा निरनिराळ्या सेवा सुविधांची माहिती मिळण्यासाठी होणारा उपयोग, भारतातील माहिती तंत्रज्ञान उद्योगाची वाढ व त्याचा दर्जा, शासनाचे कार्यक्रम, जसे मिडीया लॅब एशिया, विद्या वाहिनी, ज्ञान वाहिनी, सामूहिक माहिती केंद्र इत्यादी, माहिती तंत्रज्ञान उद्योगातील मूलभूत प्रश्न व त्यांचे भवितव्य.

पेपर क्रमांक 2 :अभ्यासक्रम सविस्तर पण खालील प्रमाणे दिलेला आहे.

१) बुध्दीमत्ता चाचणी

२) महाराष्ट्राचा भूगोल : महाराष्ट्राचा रचनात्मक भुगोल,  मुख्य रचनात्मक विभाग, हवामान, प्रजन्य आतील विभागावर बदल, नद्या, पर्वत, डोंगर ,राजकीय विभाग ,प्रशासकीय विभाग ,नैसर्गिक संपत्ती –  वने व खनिजे,  मानवी व सामाजिक भूगोल – लोकसंख्या, Migration of Population व त्यांचे Source आणि Destination वरील परिणाम, ग्रामीण मस्त व तांबे वस्त्या व  तांडे, झोपडपट्ट्या व त्यांचे प्रश्न, संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान.

३) महाराष्ट्राचा इतिहास –  सामाजिक व आर्थिक जागृती (१८८५-१९४७), महत्वाच्या व्यक्तीचे काम, स्वातंत्र्यपूर्व भारतातील सामाजिक जागृतीतील वर्तमानपत्रे व शिक्षणाचा परिणाम, स्वातंत्र्यपूर्व काळातील इतर समकालीन चळवळी, राष्ट्रीय चळवळ.

४) भारतीय राज्यघटना – घटना कशी तयार झाली आणि घटनेच्या प्रस्तावनेमागची भूमिका व तत्वे, घटनेची महत्वाची कलमे/  ठळक वैशिष्ट्ये, केंद्र व राज्य संबंध,  निधर्मी राज्य, मूलभूत हक्क व कर्तव्ये राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्वे-शिक्षण, यूनिफ्रोम सिव्हिल कोड, स्वतंत्र न्यायपालिका.

५) मानवी हक्क व जबाबदाऱ्या – संकल्पना- आंतरराष्ट्रीय मानवी हक्क मानक, त्यासंदर्भातील भारतीय राज्यघटनेतील तरतूद, भारतातील मानवी हक्क व जबाबदाऱ्या यंत्रणेची अंमलबजावणी व संरक्षण, भारतातील मानवी हक्क चळवळ, मानवी हक्कापासून वंचित  राहण्याच्या समस्या,  गरीबी ,निरक्षरता, बेकारी,  सामाजिक -सांस्कृतिक-धार्मिक प्रथा यांसारख्या अडचणी,  (हिंसाचार, भ्रष्टाचार,दहशतवाद,कामगारांचे शोषण, संरक्षित गुन्हेगारी इत्यादी.)  लोकशाही व्यवस्थेतील एकमेकांचे हक्क आणि मानवी प्रतिष्ठा एकतेचा आदर करण्यासंबंधी प्रशिक्षणाची गरज व महत्त्व,  नागरी हक्क संरक्षण अधिनियम १९५५,  मानवी हक्क संरक्षण अधिनियम १९९३, कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम २००५,  अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचारास प्रतिबंध)  अधिनियम १९८९,   हुंडाबंदी अधिनियम १९६१, महात्मा गांधी तंटामुक्ती अभियान.

६) महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१  ( Maharashtra Police Act )

७)  भारतीय दंड संहिता १८६०( Indian Penal Code ) ८)फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ ( Criminal Procedure Code ) 

९) भारतीय पुरावा अधिनियम १८७२ ( Indian Evidence Code ) 

शारीरिक चाचणी

१) फक्त PSI पदाकरिता शारीरिक चाचणी घेण्यात घेण्यात येते.

२) लेखी परीक्षेत आयोगाने निश्चित केलेल्या कट ऑफ असतील किंवा त्या पेक्षा जास्त गुण मिळविणाऱ्या उमेदवारांना शारीरिक चाचणीसाठी बोलावण्यात येते.

३) शारीरिक चाचणी एकूण शंभर गुणांची असेल.

४) शारीरिक चाचणीचे गुण Qualifying करण्यात आले असून शारीरिक चाचणी मध्ये उत्तीर्ण होण्यासाठी एकूण गुणांपैकी किमान 60% गुण मुलाखतीस पात्र होण्यासाठी आवश्यक राहतील. तसेच या गुणांचा अंतिम निवडीकरिता विचार होणार नाही.

शारीरिक चाचणीचा तपशील पुढील प्रमाणे :

मुलाखत :

१) फक्त PSI पदाकरिता मुलाखत घेण्यातील घेण्यात येईल मुलाखत 40 गुणांची असेल.

२) शारीरिक चाचणीच्या निकालाच्या आधारे मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांनाच मुलाखतीसाठी बोलविण्यात येईल.

Leave a Comment