Marathi Mhani with Meaning
मराठी म्हणी ओळखा
नमस्कार मित्रांनो, आज आपण या लेखांमधून मराठीमधील प्रसिद्ध आणि नेहमी वापरल्या जाणाऱ्या 1000+हून अधिक मराठी म्हणी व त्यांचे अर्थ पाहणार आहोत. तसेच मोफत नवीन जुन्या सर्व म्हणी व वाक्यप्रचार यांचे पुस्तक PDF स्वरूपात दिली आहे. म्हणी त्याचा अर्थ लोकांनी दैनंदिन जीवनात वापरल्या जाणाऱ्या किंवा उचलणारे मार्मिक वाक्य.
जर तुम्ही स्पर्धा परीक्षा किंवा अन्य परीक्षांची तयारी करत असाल तर मराठी विषयातील मराठी म्हणी याबद्दल माहिती दिली आहे. MPSC किंवा अन्य स्पर्धा परीक्षांमध्ये मराठी म्हणी व त्यांचे अर्थ व वाक्यात उपयोग या स्वरूपात प्रश्न विचारले जातात. खाली काही म्हणी व त्यांचे अर्थ सह दिले आहेत.
मराठी म्हणी व त्यांचे अर्थ व वाक्यात उपयोग PDF
म्हणी | अर्थ |
---|---|
असतील शिते तर जमतील भूते | एखाद्या माणसाकडून फायदा होणार असला की त्याच्या भोवती माणसे गोळा होतात. |
विंचवाचे बिऱ्हाड पाठीवर | गरजेपुरता गोष्टी घेऊन फिरणे. |
शहाण्याला शब्दांचा मार | शहाण्या माणसाला समजावून सांगितल्यास तो ताळ्यावर येतो. |
वरातीमागून घोडे | एखादी गोष्ट घडल्यावर त्याबाबत उपाय करणे व्यर्थ असते. |
असंगाशी संग आणि प्राणाशी गाठ | दुर्जन माणसाची संगत केल्यास प्रसंगी जीवाला धोकाही निर्माण होतो. |
लाज नाही मना, कोणी काही म्हणा | निर्लज्ज मनुष्य दुसऱ्याच्या टीकेची पर्वा करीत नाहीत. |
कुर्हाडीचा दांडा गोतास काळ | आपलेच माणूस आपल्या नाशाला कारणीभूत होणे. |
लंकेत सोन्याच्या विटो | दुसरीकडे असलेल्या फायद्याच्या गोष्टीचा आपल्याला उपयोग नसतो. |
आधी पोटोबा मग विठोबा | प्रथम पोटर सोय पाहावी नंतर देवधर्म करावा. |
लोका सांगे ब्रह्मज्ञान, आपण मात्र कोरडे पाषाण | लोकांना उपदेश करायचा, पण स्वतः मात्र त्यापमाणे वागायचे नाही. |
लेकी बोले सुने लागे | एकाला उद्देशून, पण दुसऱ्या लागेल असे बोलले. |
रोज मरे त्याला कोण रडे | तीच गोष्ट वारंवार होऊ लागली म्हणजे तिच्यातील सारस नष्ट होते व तिच्याकडे कोणीही लक्ष देत नाही. |
कुडी तशी पुडी | शरीराप्रमाणे आहार असणे. |
रात्र थोडी सोंगे फार | कामे भरपूर पण वेळ थोडा. |
आपलेच दात, आपलेच ओठ | आपल्याच माणसाने चूक केल्यामुळे अडचणीची स्थिती निर्माण होणे. |
ये रे माझ्या मागल्या | एखाद्याने केलेला उपदेश वेळ ठरवून पुन्हा पूर्वीसारखेच वागणे. |
वासरात लंगडी गाय शहाणी | मूर्ख माणसात अल्प ज्ञान असणारा शहाणा. |
अन्नछत्रात देऊन वर मिरपूड मागणे | फुकटचे खाऊन वर मिसाज करणे. |
हत्ती गेला आणि शेपूट राहिली | कामाचा बहुतेक भाग पूर्ण झाला आणि फक्त थोडा शिल्लक राहिला. |
आग सोमेश्वरी बंब रामेश्वरी | एकीकडे संकट असताना दुसरीकडे उपाय कारणे. |
हलवायाच्या घरावर तुळशीपत्र | परस्पर दुसर्याची वस्तू तीसऱ्यला देणे. स्वतःला जिस लागू न देणे. |
अति तेथे माती | कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा शेवट नुकसान कारक ठरतो. |
हाताच्या काकणाला आरसा कशाला? | स्पष्ट असलेल्या गोष्टींना पुरावा नको. |
अति शहाणा त्याचा बैल रिकामा | जो मनुष्य फार शहाणपणा करत जातो त्याची मुळीच काम होत नाही. |
सगळे मुसळ केरात | मुख्य गोष्टीकडे दुर्लक्ष झाल्यामुळे सर्व श्रम व्यर्थ जाणे. |
अडला हरी गाढवाचे पाय धरी | एखाद्या बुद्धिमान सज्जन माणसाला देखील अडचणीच्या वेळी मूर्त दुर्जन माणसाची विनवणी करावे लागते. |
सुंभ जळला तरी पीळ जात नाही | हत्ती मनुष्याच्या हट्टामुळे नुकसान झाले तरी त्याच्या हाताला नाहीसा होत नाही. |
साखरेचे खाणार त्याला देव देणार | भाग्यवान माणसाला कशाची उणीव पडत नाही. |
उथळ पाण्याला खळखळाट फार | अंगात थोडीशी कुवत असून देखील जास्त दिमाग दाखवणे. |
शितावरून भाताची परीक्षा | वस्तूच्या लहानशा भागावरून त्या संपूर्ण वस्तूची परीक्षा करणे. |
बाप से बेटा सवाई | पडण्यापेक्षा मुलगा अधिक कर्तबगार. |
आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन डोळे | अपेक्षेपेक्षा जास्त फायदा होणे. |
बोलेल तो करेल काय? | केवळ बडबड करणारा कडून काही होऊ शकत नाही. |
पै दक्षिणा लक्ष प्रदक्षिणा | थोड्या मोबदल्यात जास्त कार करून घेणे. |
बुडत्याला काडीचा आधार | घोर संकट अशा प्रसंगी मिळालेली थोडीशी मदत देखील महत्त्वाची वाटते. |
खाईन तर तुपाशी नाहीतर उपाशी | अतिशय दूर आग्रहाचे किंवा हटवादीपणा चे वागणे, तडजोड मुळीच न करणे. |
आंधळं दळतं कुत्र पिठ खातं | एकाने काम करावे दुसऱ्याने त्याचा फायदा घ्यावे |
सरड्याची धाव कुंपणापर्यंत | कमजोर माणसाचे काम मर्यादित असते. |
बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले | बोलल्याप्रमाणे कृती करणाऱ्या माणसाला सन्मानाने वागवावे. |
बळी तो कान पिळी | बलवान मनुष्यच इतरांवर सत्ता गाजवतो. |
उधारीचे पोते सव्वा हात रिते | उदा घेतलेल्या गोष्टीत तोटा ठरलेलाच. |
बाप तसा बेटा | बापाच्या अंगचे गुण हाच मुलाचा उतरणे. |
बडा घर पोकळ वासा | दिसणे श्रीमंत पण प्रत्यक्षात तिचा अभाव. |
बैल गेला अन् झोपा केला | एखादी गोष्ट होऊन गेल्यावर तिचे निवारण करण्यासाठी केलेली व्यवस्था व्यर्थ ठरते. |
इकडे आड तिकडे विहीर | दोन्ही बाजूने सारखीच अडचणीची स्थिती निर्माण होणे. |
बुडत्याचा पाय खोलात | ज्याचा अपकर्ष व्हायला असतो सतत उपेक्षाच येत जाते. |
अधिक सून पाहुण्याकडे | अधिक सवलतीचा अधिक कामासाठी उपयोग करणे. |
बावळी मुद्रा देवळी निद्रा | दिसण्यात बावळट पण व्यवहारात चतुर माणूस. |
फुल ना फुलाची पाकळी | वास्तविक जितके द्यायला पाहिजे तितके देण्याचे सामर्थ्य नसल्यामुळे त्यापेक्षा पुष्कळ कमी देणे. |
कोल्हा काकडीला राजी | क्षुद्र मनुष्य मामले गोष्टीत खुश असतो. |
Marathi Mhani Funny List PDF
- मराठी म्हणी 100
- मराठी म्हणी 50