महाराष्ट्रातील जिल्हे | Maharashtratil Jilhe PDF

महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांची नावे

नमस्कार मित्रानो, आज आपण या लेखांमधून महाराष्ट्र राज्यातील जिल्ह्याविषयी माहिती बघणार आहोत. जर तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर हे लेख तुम्हाला महाराष्ट्रातील जिल्ह्याविषयी माहिती उपयुक्त ठरेल.

महाराष्ट्रातील जिल्हे माहिती – Maharashtratil Jilhe

तर मित्रांनो महाराष्ट्र या नवीन राज्याची निर्मिती 1 मे 1960 रोजी झाली होती आणि एक मे हा “महाराष्ट्र दिन” म्हणून साजरा केला जातो. 1980 पर्यंत महाराष्ट्र राज्यात 26 जिल्हे अस्तित्वात होते. 1981 नंतर काही जिल्ह्यांचे विभाजन झाले असून आज अखेर राज्यात जिल्ह्याचे संख्या 36 इतकी झाली आहे. राज्यात क्षेत्रफळाने अहमदनगरला सर्वात मोठा जिल्हा तर मुंबई शहर हे सर्वात लहान जिल्हा आहे. महाराष्ट्र राज्यात एकूण 34 जिल्हा परिषद आहेत तर मुंबई शहर व मुंबई उपनगर या जिल्ह्यांना जिल्हा परिषद नाहीत. सिंधुदुर्ग हा सर्वात कमी लोकसंख्येचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. 1981 पासून महाराष्ट्र राज्यातील जिल्ह्याची विभाजन खाली तक्त्यामध्ये दिले आहे.

विभाजनाचा दिवसजुना जिल्हानवीन जिल्हे
१ मे १९८१रत्नागिरीसिंधुुर्गन
१ मे १९८१औरंगाबादजालना
१६ ऑगस्ट १९८२उस्मानाबादलातूर
२६ ऑगस्ट १९८२चंद्रपूरगडचिरोली
१९९०बृहन्मुंबईमुंबई शहर व मुंबई उपनगर
१ जुलै १९९८अकोलावाशिम
१ जुलै १९९८धुळेनंदुरबार
१ मे १९९९परभणीहिंगोली
१ मे १९९९भंडारागोंदिया
१ ऑगस्ट २०१४ठाणेपालघर

महाराष्ट्रातील 36 जिल्हे Maharashtra District List PDF

महाराष्ट्र राज्यात आज जिल्ह्याची संख्या 36 आहे. खालील तक्त्यामध्ये आपण जिल्ह्याचे नाव त्यांचे स्थापनादिन व क्षेत्रफळ पाहणार आहोत.

जिल्ह्याचे नावस्थापनाक्षेत्रफळ
पालघर१ ऑगस्ट २०१५५३४४ चौकिमी
अकोला१ मे १९६०५४३० चौकिमी
अमरावती१ मे १९६०१२,२१० चौकिमी
अहमदनगर१ मे १९६०१७,४१३ चौकिमी
औरंगाबाद१ मे १९६०१०,१०७ चौकिमी
उस्मानाबाद१ मे १९६०७,५६९ चौकिमी
कोल्हापूर१ मे १९६०७६८५ चौकिमी
गडचिरोली२६ ऑगस्ट १९८२१४,४१२ चौकिमी
गोंदिया१ मे १९९९५४२५ चौकिमी
चंद्रपूर१ मे १९६०११,४४३ चौकिमी
जळगाव१ मे १९६०११,७६५ चौकिमी
जालना१ मे १९८१७७१८ चौकिमी
ठाणे१ मे १९६०९,५५५ चौकिमी
धुळे१ मे १९६०८०६३ चौकिमी
नागपूर१ मे १९६०९,८०२ चौकिमी
नाशिक१ मे १९६०१५,५३० चौकिमी
नांदेड१ मे १९६०१०,५२८ चौकिमी
नंदुरबार१ जुलै १९९८५०३४ चौकिमी
परभणी१ मे १९६०६५१७ चौकिमी
पुणे१ मे १९६०१५,६५० चौकिमी
बीड१ मे १९६०१०६९३ चौकिमी
बुलढाणा१ मे १९६०९,६७८ चौकिमी
भंडारा१ मे १९६०३८९५ चौकिमी
मुंबई शहर१ ऑक्टोबर १९९०१५७ चौकिमी
मुंबई उपनगर१ मे १९६०४४६ चौकिमी
यवतमाळ१ मे १९६०१३,५८२ चौकिमी
रत्नागिरी१ मे १९६०८२०८ चौकिमी
रायगड१ मे १९६०७१५२ चौकिमी
लातूर१५ ऑगस्ट १९८२७१५७ चौकिमी
वर्धा१ मे १९६०६३०९ चौकिमी
वाशिम१ जुलै १९९८५१५३ चौकिमी
सातारा१ मे १९६०१०,४८० चौकिमी
सांगली१ मे १९६०८५७२ चौकिमी
सोलापूर१ मे १९६०१४८९५ चौकिमी
सिंधुदुर्ग१ मे १९८१५२०७ चौकिमी
हिंगोली१ मे १९९९४५२४ चौकिमी