महाराष्ट्रातील घाट मार्ग -Maharashtratil Ghat Information in Marathi

महाराष्ट्रातील घाटांची माहिती

नमस्कार मित्रांनो, आपण आज महाराष्ट्राचा भूगोल या विषयांमधील महाराष्ट्रातील घाट मार्ग या घटकाबद्दल जाणून घेणार आहोत. अनेक स्पर्धा परीक्षा मध्ये महाराष्ट्रातील घाट(Maharashtratil Ghat) या घटकावर अनेकदा प्रश्न विचारले गेलेले आहेत जसे की MPSC, तलाठी भरती पोलीस भरती आणि अनेक परीक्षा मध्ये विचारले गेले आहे. जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत त्यांना महाराष्ट्रातील घाटांची माहिती मिळण्यासाठी हा लेख खूप उपयोगी पडेल.

महाराष्ट्राला भौगोलिकदृष्ट्या कोकणातून देशात प्रवेश करण्यासाठी प्रमुख घाट ओलांडावे लागतात. सह्याद्री पर्वत हा कोकण व पठार यांच्या दरम्यान असल्याने कोकणातून पठारावर जाण्याकरिता सह्याद्री पर्वत ओलांडूनच जावे लागते. याकरिता सह्याद्री पर्वताची उंची जेथे जेथे कमी झालेली आहे त्या ठिकाणी घाट मार्ग तयार झालेले आहेत. महाराष्ट्रातील प्रमुख घाट मार्ग विषयी या लेखात सविस्तरपणे जाणून घेणार आहोत.

महत्त्वाचे : स्पर्धा परीक्षेत उदाहरणार्थ MPSC व सरळ सेवा अंतर्गत घेण्यात येणाऱ्या परीक्षेत या घटकावर प्रश्न असतोच, या परीक्षेत उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रमानुसार प्रश्न विचारले गेलेले आहेत तर क्रमानुसार लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा, हे महाराष्ट्रातील घाट लवकर लक्षात राहत नाहीत तर लक्षात ठेवण्यासाठी स्वतः तुमच्या Tricks तयार करून लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा किंवा दररोजच्या एकदा तरी नजर फिरवा.

घाट म्हणजे काय ? (What is Ghat)

पर्वताच्या रांगा जेव्हा लांबच लांब पसरलेल्या असतात तेव्हा त्या उंच, लांब रांगांमध्ये कमी उंचीचा भाग असतो अशा कमी उंचीच्या भागास घाट म्हणतात.

महाराष्ट्रातील प्रमुख घाट (Maharashtratil Ghat List)

मार्ग घाट
नाशिक – जव्हर शिरघाट
ठाणे – नगर माळशेज घाट
पनवेल – नारायणगाव भीमाशंकर घाट
मुंबई – पुणेबोर घाट
महाड – पुणेवरंधा घाट
पुणे – सातारा खंबाटकी घाट
पाचगणी – वाईपरसणी घाट
सावंतवाडी – कोल्हापूर फोंडा घाट
नाशिक – पुणे चंदनापुरी घाट
सावंतवाडी – बेळगाव आंबोली घाट
नाशिक – मुंबई थळ (कसारा) घाट
कल्याण – जुन्नर नाणे घाट
महाड – महाबळश्वर पार घाट
नाशिक – धुळेललिंग घाट
कोल्हापूर – कणकवलीहनुमंत घाट
कोल्हापूर- राजापूरकरुल घाट
चिपळूण – कराडकुंभार्ली घाट
रत्नागिरी – कोल्हापूर आंबा घाट
राजापूर – कोल्हापूर अनुष्करा घाट
पुणे – बारामती दिवे घाट
धुळे – औंरगाबाद कन्नड घाट

महत्त्वाचे : सह्याद्री पर्वतात अशाप्रकारचे पुढील महत्त्वाचे घाट आहेत. सह्याद्री उत्तरेकडून दक्षिणेकडे पर्वतरांगा वरून गेल्यास माळशेज घाट, आंबेनळी घाट, बोरघाट, कुंभार्ली घाट, आंबा घाट, फोंडा घाट आणि आंबोली घाट यासारखे महत्त्वाचे घाट आढळतात. हे घाट म्हणजे कोकण व महाराष्ट्र पठार यांना जोडणारे दुवे आहेत.

Leave a Comment