List Of Chief Minister of Maharashtra in Marathi
नमस्कार मित्रांनो, आज आम्ही तुम्हाला या लेखांमधून महाराष्ट्रातील आजचे मुख्यमंत्री व त्यांचे कारकिर्दी माहिती जाणून घेणार आहोत. महाराष्ट्र या राज्याची स्थापना 1 मे 1960 रोजी झाली होती तर तेव्हापासून आजपर्यंतचे सर्व मुख्यमंत्र्यांचे लिस्ट खाली दिली आहे.
महाराष्ट्राचे आतापर्यंतचे मुख्यमंत्री – Maharashtra CM List 2022 in Marathi
१) यशवंतराव बळवंतराव चव्हाण
- कार्यकाल: १ मे १९६० ते १९ नोव्हेंबर १९६२
- आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार व महाराष्ट्राचे भाग्यविधाते.
- यांचा जन्म 12 मार्च 1912, देवराष्ट्र (तालुका खानापूर जिल्हा सांगली)
- 1 नोव्हेंबर 1956: बहुभाषिक मुंबई राज्याचे पहिले व एकमेव मुख्यमंत्री.
- 1 मे 1960: स्वतंत्र महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री.
- कुळ कायदा करून ‘कसेल त्याची जमीन’ हे धोरण.
- 1962 मध्ये भारताच्या संरक्षण मंत्री पदी नियुक्ती त्यानंतर भारताचे उपपंतप्रधान.
- यशवंतराव चव्हाण यांचे साहित्य: कृष्णाकाठ (आत्मचरित्र), ऋणानुबंध, युगांतर, सह्याद्रिचे वारे.
२) मारोतराव कन्नमवार
- कार्यकाल: 20 नोव्हेंबर 1962 ते 24 नोव्हेंबर 1963.
- संरक्षण क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण कार्य करताना ओझर येथील मी विमानाचा कारखाना वरणगाव भंडारा भद्रावती येथे संरक्षण साहित्य निर्मीती कारखाने यांच्या कारकिर्दीत उभारण्यात आले.
३) परशुराम कृष्णाजी सावंत
- नोव्हेंबर ते डिसेंबर 1963 या काळात तेरा दिवस महाराष्ट्राचे अंगामी मुख्यमंत्री.
४) वसंतराव फुलसिंग नाईक
- कार्यकाल: 5 डिसेंबर 1963 23 फेब्रुवारी 1975.
- महाराष्ट्राचे सर्वात दीर्घकाळ कार्यरत राहिलेले मुख्यमंत्री.
- महाराष्ट्राच्या कृषी विकासात मोलाचे योगदान ‘पाणी आडवा पाणी जिरवा’ तसेच ‘रोजगार हमी योजना’ यांच्या कारकिर्दीत सुरू झाले.
- १ जुलै हा त्यांचा जन्मदिवस महाराष्ट्र ‘कृषी दिन’ म्हणून साजरा केला जातो.
५) शंकरराव भाऊराव चव्हाण
- शंकराव चव्हाण हे 1975 ते 77 व पुन्हा 1986 ते 1988 या काळात दोनदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले. जायकवाडी प्रकल्प, विष्णुपुरी उपसा जलसिंचन प्रकल्प, उर्दू अकादमी, कापूस एकाधिकार खरेदी योजना ही त्यांच्या कारकीर्दीतील प्रमुख कार्ये.
६) वसंतदादा बंडोजी पाटील
- कार्यकाल: 1977 ते अष्टयात्तर आणि 1983 ते 85 असे दोन वेळा मुख्यमंत्री.
- कृषी व औद्योगिक तसेच सहकार क्षेत्राचे मजबुतीकरण केले.
- वैद्यकीय व अभियांत्रिकी महाविद्यालयांना विनाअनुदान तत्वावर मान्यता देण्याचा निर्णय घेणाऱ्या मुख्यमंत्री.
७) शरदचंद्र गोविंदराव पवार
- कार्यकाल: 1978 ते 1980 या काळात पुलोद आघाडीची स्थापना करून वयाच्या 38 व्या वर्षी सर्वात तरुण मुख्यमंत्री.
- 1981 ते 1991 1993 1995 असे एकूण तीन वेळा मुख्यमंत्रीपदी.
- 1994 मध्ये महाराष्ट्राचे महिला धोरण, महिला आयोगाची स्थापना.
- मराठवाडा विद्यापीठाचे नामांतर, नांदेड विद्यापीठाची स्थापना.
- 1955 नंतर केंद्रीय राजकारणात सक्रिय.
८) बॅरिस्टर अब्दुल रहमान अंतुले
- कार्यकाल: 1980 ते 1982
- नाशिक अमरावती हे दोन नवे प्रशासकीय विभाग लातूर जालना व सिंधुदुर्ग या तीन नवीन जिल्ह्याची निर्मिती कुलाबा जिल्ह्याचे रायगडचे नामांतर.
९) बॅरिस्टर बाबासाहेब आनंदराव भोसले
- कार्यकाल: 1982 ते 1983
- साजिरी कुटुंब कल्याण योजना, १९८२ मुलींना दहावीपर्यंत मोफत शिक्षण कोल्हापूर चित्रनगरी ची स्थापना अमरावती विद्यापीठ गडचिरोली जिल्ह्याची निर्मिती औरंगाबाद येथ उच्च न्यायालयाचे खंडपीठ.
१०) डॉ. शिवाजीराव पाटील-निलंगेकर
- कार्यकाल: 1985 ते 1986
- रोजगार हमी योजनेतील मजुरांना मजुरी शिवाय रोज अर्धा किलो ज्वारी देण्याचा ग्रामपंचायतींना दूरदर्शन संच त्याचे वाटप लोकन्यायालयाची स्थापना.