Maharashtra Bhugol in Marathi
महाराष्ट्राचा भूगोल (Maharashtra Bhugol): आज या लेखामध्ये महाराष्ट्राचा भूगोल संबधित माहिती पाहणार आहोत, इयत्ता 1 ली पासून ते 10 वी पर्यंत हा विषय अभ्यासक्रमात आहे. जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षा चे अभ्यास करतात, त्याना भूगोल हा घटक खूप महत्त्वाचा आहे कारण की, विद्यार्थांना हा घटक पैकीच्या पैकी मार्क मिळवून देऊ शकतो. महाराष्ट्राचा भूगोल विषयी MPSC मध्ये Group B आणि ग्रुप C या मध्ये प्रश्नपत्रिकेत १५-२० प्रश्न हमखास विचारले जातात.
Maharashtracha Bhugol
महाराष्ट्राचा भूगोल या विषयाचे बेसिक पक्के करण्यासाठी क्रमिक पुस्तके खूप महत्त्वाचे आहेत. इयत्ता 5 वी ते 12 वी पर्यंत चे महाराष्ट्र शासनाचे क्रमिक पुस्तके स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थी नी एकदा तरी नक्की वाचावे, जेणे करून बेसिक पक्के होईल.
या लेखामध्ये महाराष्ट्र भूगोल संबधित 10 घटक आपण अभ्यासणार आहोत, त्यामधील पूर्व व मुख्य परीक्षे साठी 8 टॉपिक महत्वाचे आहेत.तर ते क्रमागत एकएक टॉपिक अभ्यासणार आहोत.
Maharashtra Geography in Marathi PDF
महाराष्ट्राचा भूगोल यामध्ये मुख्यत:
1) महाराष्ट्र राजकीय आणि प्रशासकीय:
1 नोव्हेंबर 1956 रोजी महाराष्ट्र व गुजरात मिळून द्वीभाषिक मुंबई राज्याची स्थापना झाली पुढे त्यातूनच 1 मे 1960 रोजी स्वतंत्र महाराष्ट्र राज्याचे निर्मिती करण्यात आली. महाराष्ट्र हे भारत प्रदेशातील एक महत्त्वाचे औद्योगिक व प्रगत घटक राज्य व उत्तर व दक्षिण भारताला साधणारे फार मोठे ऐतिहासिक, राजकीय, सामाजिक व आर्थिक परंपरा असलेले महाराष्ट्र हे भारतातील एक महत्त्वपूर्ण राज्य होय. महाराष्ट्राचा भूगोल घटकांमधील पुढील घटकांचे सविस्तर माहिती पाहणार आहोत. महाराष्ट्र शेजारील राज्य व राज्यांना लागून असणारे जिल्हे, महाराष्ट्रातील जिल्हा निर्मिती, महाराष्ट्राचे प्रादेशिक विभाग, महाराष्ट्राचे प्रशासकीय विभाग, जिल्ह्याचे मुख्यालय, महाराष्ट्रात जिल्हानिहाय तालुके.
2) महाराष्ट्राचा रचनात्मक/प्राकृतिक भूगोल:
महाराष्ट्र राज्य हे वेगवेगळ्या प्राकृतिक रचनेमध्ये विभागलेले आहे, तसेच महाराष्ट्राच्या उत्तर भागात पूर्व-पश्चिम विस्तारलेले सातपुडा पर्वतरांग वसलेले आहे, तसेच महाराष्ट्राच्या पश्चिम दिशेला लागून असणाऱ्या समुद्रामुळे व पश्चिम भागात उत्तर दक्षिण पसरलेला उंच पर्वत रांगा सह्याद्रीमुळे कोकण किनारा हा एक प्राकृतिक विभाग आहे. महाराष्ट्राचे प्राकृतिक दृष्ट्या तीन विभाग पडतात. ते म्हणजे कोकण (पश्चिम किनारा), सह्याद्री व तिच्या रांगा (पश्चिम घाट), महाराष्ट्र पठार (दख्खनचे पठार/देश) ,यापैकी महाराष्ट्र पठार 90% भूभाग व्यापलेला आहे.
3) नदिप्रणाली:
भारतात साधारणता नद्यांचे दोन प्रकार पडतात. प्रथम म्हणजे हिमालयात उगम पावणाऱ्या नद्या व पठारावर उगम पावणाऱ्या नद्या महाराष्ट्र हा दख्खनच्या पठारावर येणारा भाग असल्याने सहजिकच महाराष्ट्रातून वाहणाऱ्या सर्व नद्या म्हणजे पठारावरुन उगम पावणाऱ्या नद्या महाराष्ट्रातून नद्यांपैकी एक ही नदी हिमालयात उगम पावणारे नाही किंवा बारामही नदी नाही. त्यामध्ये महाराष्ट्रातील पूर्वेकडील वाहणाऱ्या नद्या महत्त्वाचे आहे ते म्हणजे गोदावरी, भीमा, कृष्णा, कोयना, पंचगंगा, पैनगंगा, वर्धा, वैनगंगा त्याप्रमाणेच पश्चिमेकडील वाहणाऱ्या नद्या पूर्णा, नर्मदा, उल्हास, वैतरणा, सावित्री, वशिष्ठी या कोकणातील नद्या आहेत.
4) हवामान :
महाराष्ट्र हा उष्णकटिबंधीय प्रदेशात येतो त्याच बरोबर महाराष्ट्रात उन्हाळा व हिवाळा या ऋतू सोबत पावसाळा हा स्वतंत्र ऋतू हे आढळून येतो त्यामुळेच महाराष्ट्र हवामानाच्या दृष्टीकोणातून उष्ण कटिबंधीय मोसमी हवामानाच्या प्रदेशात मोडतो महाराष्ट्राची वैशिष्ट्यपूर्ण भौगोलिक रचना पश्चिमेला असणारा अरबी समुद्र महाराष्ट्राचा अक्षवृत्तीय विस्तार राज्यातील नैऋत्य व ईशान्य मोसमी मोसमी वाऱ्यांच्या अस्तित्व व पूर्वेकडील पसरलेला पठारी प्रदेश यासारख्या घटकांचा प्रभाव महाराष्ट्राच्या हवामानावर पडतो
5) वने:
महाराष्ट्रातील वनांचे प्रमाण हे प्रामुख्याने पूर्व विदर्भ व सह्याद्री व त्यांच्या उपरांगावर मोठ्या प्रमाणावर आहे विशेषत: सह्याद्री पर्वतांच्या पूर्व पश्चिम सदाहरित व निमसदाहरित जंगले वाढलेली आहेत. महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वतावरील ही वनसंपदा जैवविविधतेने नटलेले असून जैवविविधतेच्या बाबतीत अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जाते. जैवविविधता म्हणजे एखाद्या प्रदेशाच्या एका चौरस किलोमीटर क्षेत्रफळ यामध्ये जास्तीत जास्त प्रकारचे वनस्पती व प्राणी यांच्या प्रजातीचे अस्तित्व असणे होय. जगात सर्वात अधिक जैवविविधता ही विषुववृत्तीय हवामानाच्या प्रदेशात मध्ये आढळते. महाराष्ट्रात सहा प्रकारचे वने आढळतात , त्यामध्ये उष्णकटिबंधीय सदाहरित वने, उष्णकटिबंधीय निम सदाहरित वने, उष्ण कटिबंधीय आद्र पानझडी/मान्सून वने, उपोष्ण कटिबंधीय सदाहरित वने, उष्णकटिबंधीय शुष्क पानझडी वने, काटेरी वने. महाराष्ट्रातील साधारणपणे उष्णकटिबंधीय शुष्क पानझडी वने 60 टक्के आहेत.
6) खनिजसंपत्ती:
महाराष्ट्राचे सर्व खनिज संपत्ती मुख्यतः पूर्व विदर्भ व दक्षिण कोकणात एकवटलेली आहे. महाराष्ट्राच्या खनिज संपत्तीत प्रामुख्याने दगडी कोळसा, बॉक्साइट, चुनखडी, लोहखनिज, क्रोमाइट, डोलोमाईट याचबरोबर खनिज तेलाचे साठे आहेत. देशाच्या एकूण खनिज संपत्तीचे उत्पादनात महाराष्ट्राचा वाटा चार टक्के आहे, तसेच महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रापैकी 29% खनिज संपत्तीचा शोध घेण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. महाराष्ट्रातील खनिज संपत्तीचे वितरण हे असमान झाले आहे, राज्यातील 36 पैकी फक्त 11 जिल्ह्यात खनिज संपत्ती मोठ्या प्रमाणात एकवटलेल्या आहेत.
7) लोकसंख्या:
भारत सरकार प्रत्येक दहा वर्षांनी जनगणना करते, त्यामध्ये महाराष्ट्राची लोकसंख्या 2011 नुसार 11:24 कोटि आहे, तर लोकसंख्येच्या बाबतीत स्पर्धा परीक्षेत एखादा प्रश्न नक्की असतो त्यामुळे त्यामधील घटकनिहाय सर्व माहिती यामध्ये मिळेल.
8) मृदा व जल सिंचन:
महाराष्ट्रातील 90 टक्के पेक्षा अधिक भाग बेसाल्ट खडकापासून तयार झालेला आहे, परिणामी महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर बेसाल्ट खडकापासून तयार झालेली काळी मृदा आढळते. महाराष्ट्रात साधारणतः पाच ते सहा प्रकार मृदा आढळून येते, त्यामध्ये काळी मृदा किंवा रेगूर मृदा, जांभी मृदा, लालसर किंवा तांबडी मृदा, गाळाची मृदा, दलदलीचे मृदा हे महत्वाचे आहेत.
9) वाहतूक:
महाराष्ट्राच्या आर्थिक विकासात वाहतुकीचा महत्त्वपूर्ण वाटा आहे. महाराष्ट्रातील ग्रामीण भागातून कच्चामाल कारखान्यापर्यंत तोच maal pardeshat पोहोचणे, महाराष्ट्राचा औद्योगिक पट्टा म्हणून ओळखला जाणारा मुंबई-पुणे-नाशिक या भागात तर वाहतुकीचे जाळे मोठे प्रमाणावर पसरलेले आहे की, मिळणा-या वाहतुकीच्या असणारा झाल्यामुळे येथील उद्योगधंदे वाढ लागले आहे. महाराष्ट्रातील वाहतुक रस्ते वाहतूक, रेल्वे वाहतूक, जलवाहतूक, हवाई वाहतूक हे आहेत तरीपण रस्ते वाहतूक आणि होणारे महामार्ग वाहतूक खूप मोठ्या प्रमाणात आहे, त्यामध्ये राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग, जिल्हा रस्ते, ग्रामीण रस्ते यामध्ये ते विभागलेले आहे.
10) पर्यटन:
महाराष्ट्राला ग्रामीण पर्यटनाचे मोठे क्षेत्र उपलब्ध आहे, सुमारे 55 टक्के लोक ग्रामीण भागात राहतात शहरी भागातील लोकांना शेती व ग्रामीण भागाचा अनुभव मिळवून देणे व त्या अनुषंगाने ग्रामीण भागाचा विकास करणे हे ग्रामीण पर्यटनाचे उद्दिष्ट डोळ्यापुढे ठेवून महाराष्ट्रात ग्रामीण पर्यटन निश्चित होऊ शकते. पर्यटन या घटकांमध्ये धार्मिक, ऐतिहासिक, सांस्कृतिक, भौगोलिक क्षेत्र येतात.