लिंग व त्याचे प्रकार – Ling in Marathi

Ling Olkha in Marathi

लिंग म्हणजे काय?

लिंग म्हणजे काय (खूण/ चिन्ह) – नामाच्या रुपावरून एखादा घटक वास्तविक/ काल्पनिक नर जातीचा आहे, की मादी जातीचा आहे, की दोन्हीपैकी कोणत्याच जातीचा नाही, हे ज्यावरून कळते त्याला लिंग असे म्हणतात.

नामाचे विकिरण

लिंग, वचन व विभक्ती मुळे नामाच्या रुपात जो बदल होतो, त्याला नामाचे विकिरणअसे म्हणतात.

महत्वाचे : लिंग नामाच्या रुपावरून ओळखले जाते.

लिंगाचे प्रकार – Types of Ling in Marathi

लिंगाचे खालीलप्रमाणे तीन प्रकार पडतात.

१) पुल्लिंगी

पुरुष/नर जातीचा बोध करून देणाऱ्या शब्दाला पुल्लिंग असे म्हणतात. लिंग बाबतीत मराठी व्याकरणतअसे नियम पाळले गेले नाहीत, म्हणून तो हा सर्वनाम ज्या घटकासाठी वापरले जाते ते पुल्लींग मानावे.

उदा. मुलगा, घोडा, लोटा, धोबी, भाजीपाला इ.

महत्वाचे : वस्तू किंवा काल्पनिक घटकावरही बऱ्याचदा पुरुषत्वाचा आरोप केला जातो.

२) स्त्रीलिंगी

स्त्री/मादी जातीचा बोध करून देणाऱ्या शब्दाला स्त्रीलिंग असे म्हणतात. `ती’ या सर्वनामाचा वापर ज्या नामासाठी केला जातो, त्यांना स्त्रीलिंगी असे म्हणतात.

उदा. फळी, चिमणी, श्रीमंती, आई, दांडी इ.

महत्वाचे: काही वस्तू व भाववाचक नामेसुध्दा स्त्रीलिंग मानले जातात.

३) नपुसंकलिंगी

एखाद्या नामावरून नर/मादी असा कोणताच बोध होत नसेल तर ते नपुसकलिंगी मानतात. तृतीय पुरूषी नपुसकलिंगी एकवचनी ते सर्वनाम ज्याच्यासाठी वापरले जाते त्याला नपुसकलिंगी मानतात.

उदा. पुस्तकं, मुल, वासरू, गवत इ.

लिंग बदल नियम – Ling Badla in Marathi

नामाचे लिंग विचाराचा खालीलप्रमाणे नियम दिलेले आहेत.

नियम पहिला – आ कारांत पुल्लिंगी प्राणीवाचक नामाचे स्त्रीलिंगी रूप कारांत व नपुंसकलिंगी रूप कारान्त होते

  • उदा. मुलगा -मुलगी, पोरगा – पोरगी, कुत्रा – कुत्री

नियम दुसरा – काही प्राणीवाचक अ कारांत पुल्लिंगी नामाचे स्त्रीलिंगी रूप ई कारान्त होतात

  • उदा. हंस – हंसी, दास-दासी, वानर- वानरी, बेडुक- बेडकी, गोपी- गोपी, तरुण-तरुणी इ.

नियम तिसरा – काही प्राणीवाचक पुल्लिंगी शब्दास ईण प्रत्यय लागून त्यांची स्त्रीलिंगी रूपे होतात.

  • उदा. कुंभार – कुंभारीण, माळी – माळीण, पाटील -पाटलीण, मालक – मालकिण, वाघ वाघिण इ.

नियम चौथा – काही आ कारान्त पुल्लिंगी पदार्थवाचक नामाना ई प्रत्यय लागून त्यांची लघुत्वदर्शक स्त्रीलिंगी रूपे बनतात.

  • उदा. लोटा-लोटी, खडा-खडी, भाकरा-भाकरी, विधाता- विधात्री, पळा-पळी इ.

नियम पाचवा – संस्कृत मधून मराठीत आलेल्या नामांची स्त्रीलिंगी रूपे ई प्रत्यय लागून होतात.

  • उदा. राजा-राज्ञी, युवा-युवती, श्रीमान -श्रीमती, विद्वान-विदुषी, भगवान-भगवती, ग्रंथकता-ग्रंथकता इ.

नियम सहावा – काही शब्दांची स्त्रीलिंगी रुपे खालीलप्रमाणे स्वतंत्र रीतीने होतात.

पुरुषस्त्रीभाऊबहीण
नरमादीगृहस्थगृहीणी
पतीपत्नीवरवधू
राजाराणीबोकाभाटी
कवीकवीयित्रीव्याहीव्याहिन
वाघ्यामुरळीविधुरविधवा
पुत्रकन्याउंटसांडणी
बैलगायमोरलांडोर
मुलगासूनपोपटमैना
बंधूभगिणखोंडकालवड

नियम सातवा – काही शब्द निरनिराळ्या लिंगात आढळतात.

बागबाग
ढेकर
वेळ
व्याधी
मूल
मजा
हरिणहरिण
तंबाखू
पोर
नेत्रनेत्र

नियम आठवा – सामासिक शब्दाचे लिंग शेवटच्या शब्दावरून ठरवतात.

  • उदा. देवघर- नपुसंक. , भाजीपाला- पु.,

नियम नववा – अनेक वचनी सामासिक शब्दाचे लिंग सांगता येत नाही. उदा. आई- वडील.

नियम दहावा – खालील प्राण्यांमध्ये नर व मादी असले तरी त्यांचे लिंग स्त्रीलिंगी मानतात.

  • उदा. घार, सुसर, घूस, ऊ, पिसू, जळू, मैना इ.

नियम एकरावा -खालील प्राण्यांमध्ये नर व मादी असल्या तरी त्यांचे लिंग पुल्लींग मानतात.

  • उदा. मासा, गरुड, पोपट, साप, टोळ, सुरवंट, कावळा इ.