EWS म्हणजे काय? – EWS Certificate Meaning in Marathi, Full Form & Documents

EWS Certificate Documents in Marathi

EWS Meaning & full Form in Marathi- मित्रांनो, आज आपण EWS प्रमाणपत्र कसे काढावे (How to get ews certificate in maharashtra), त्यासाठी लागणारी कागदपत्रे, कोणकोण यासाठी पात्र आहेत, कोण अर्ज करू शकतो, किती दिवसात प्रमाणपत्र मिळून जाईल या सर्व गोष्टीची माहिती या लेखात सविस्तरपणे जाणून घेऊया, ही सर्व माहिती जाणून घेण्याअगोदर नेमके EWS म्हणजे काय? हे जाणुन घेऊया.

EWS म्हणजे काय? (EWS Meaning in Marathi)

  • EWS विधेयक 8 जानेवारी 2019 रोजी केद्र सरकार तर्फे लोकसभेत सादर करण्यात आले होते.
  • हे विधेयक भारतातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील नागरिकांना शिक्षण क्षेत्रात, सरकारी नोकऱ्या आणि केंद्र सरकारच्या इतर कल्याणकारी योजना मधील दहा टक्के आरक्षण देण्याचा अधिकार देतो. तसेच या प्रवर्गातील लाभार्थ्यांना परीक्षा फी व इतर सवलतीचा लाभ घेता येईल.
  • देशातील सर्व साधारण प्रवर्गाच्या आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील ज्यांचे एकूण कौटुंबिक  वार्षिक उत्पन्न आठ लाखापेक्षा कमी आहे, आणि जे अनुसूचित जाती(SC), अनुसूचित जमाती(ST),ओबीसी(OBC) या श्रेणीत येत नाहीत, त्यांनाच EWS श्रेणी म्हणून मान्यता प्राप्त आहे.
  • एक गोष्ट लक्षात घ्या, हे EWS प्रमाणपत्र ची VALIDITY ही केवळ 1 वर्षासाठी किंवा अर्थिक वर्षांसाठी असते. प्रत्येक वर्षी RENEW करून घ्यावे लागेल.

EWS Certificate Criteria (पात्रता)

  • अर्जदार सामान्य प्रवर्गाच्या असावा, इतर कुठल्याही प्रवगाचा अनुसूचित जाती(SC), अनुसूचित जमाती(ST),ओबीसी(OBC) लाभार्थीEWS आरक्षणास पात्र नसतील.
  • उमेदवाराच्या कुटुंबाचे एकूण वार्षिक उत्पन्न आठ लाखापेक्षा जास्त नसावे.
  • अर्जदाराच्या एकूण कुटुंबाकडे 5 एकरा पेक्षा जास्त शेती आणि १००० sq.foot पेक्षा जास्त निवासी जमीन नसावी.

EWS Full Form in Marathi

EWS चे Full from Economically Weaker Sections यालाच मराठीत आर्थिक दुर्बल घटक असे म्हणतात.

EWS आरक्षणांतर्गतत येणाऱ्या जाती:

बोहरी, ब्राह्मण, गुजराती, जैन, मराठा, लिंगायत, कोमती, लोहाणा, मारवाडी, मुस्लिम, राजपूत, सिंधि Etc.

EWS Certificate काढण्यासाठी लागणारे कागदपत्रे

घटककागदपत्रे
ओळखीचा पुरावा (कोणतेहीं एक)पासपोर्ट, मतदार ओळखपत्र,आधार ओळखपत्र, पॅन कार्ड, शासकीय व निमशासकीय ओळखपत्र.
पत्त्यांचा पुरावा (कोणतेहीं एक)मतदार यादीचा पुरावा, पाणी बिल, घराचे टॅक्स पावती, 7/12 OR 8अ उतारा, इलेक्ट्रिक बिल, पासपोर्ट, आधार कार्ड.
वयाचा पुरावा (कोणतेही एक)Birth सर्टिफिकेट, 10th and 12 board सर्टिफिकेट,Bonafide सर्टिफिकेट
उत्पन्नाचा पुरावातहसीलदार यांचा एका वर्षाचा उत्पन्नाचा दाखला
वंशावळ13/10/1967 च्या पूर्वीचा वडील/आजोबा/ पंजोबा महाराष्ट्रात राहत असल्याचा पुरावा.

Read This:- Non Creamy Layer Certificate Meaning in Marathi

EWS प्रमाणपत्र कसे काढायचे: (How to Apply for EWS Certificate)

हे प्रमाणपत्र दोन प्रकारचे असते.

1) State EWS Certificate (How to get ews certificte in maharashtra) : जर तुम्हाला राज्यांतर्गत असणाऱ्या योजना, शासकीय नोकऱ्या, ऍडमिशन लागणारी,स्पर्धा परीक्षा यासाठी सवलतीचा लाभ घेण्यासाठी.

2) Central EWS Certicate (How to get ews certificate in India): जर तुम्हाला केंद्रातर्गत असणाऱ्या योजना, शासकीय नोकऱ्या, ऍडमिशन लागणारी,स्पर्धा परीक्षा यासाठी सवलतीचा लाभ घेण्यासाठी.

EWS Certificate Online/Offline:

मित्रांनो, EWS Certificate Online व Offline असे दोन्ही प्रकार काढू शकतो.

Online Certificate Process:

यामध्ये aaple sarkar, setu suvidha kendra तुम्ही ऑनलाईन Apply करून काढू शकता. Online प्रक्रिया कशी करावी यासंबंधीचा संपूर्ण व्हिडिओ पाहून तुम्ही ऑनलाईन अर्ज दाखल करू शकता.

Offline Certificate Process:

EWS हे प्रमाणपत्र तुमच्या जिल्ह्यातील तहसील कार्यालयाला भेट देऊन सर्व कागदपत्रासह जमा करून अर्ज करावा लागतो. या प्रक्रियेला 30 दिवस लागतात. जर तुम्हाला Online Apply जमले नाही तर Offline प्रक्रिया सुद्धा करू शकता. जर तुमच्याकडे वेळ नसेल तरअसेल तर तुम्ही Offline देखील EWS Certificate काढू शकता.

EWS Certificate From PDF in Marathi:

Ews प्रमाणपत्र मिळवण्यासाठी आपल्याला EWS प्रमाणपत्र फॉर्म आवश्यक आहे. तसेच EWS प्रमाणपत्राचे फॉर्म देखील दुकानांमधून खरेदी केले जाऊ शकतात, तसेच कार्यालयातून फॉर्म देखील मिळू शकतात, परंतु आम्ही तुम्हाला हीEWS फॉर्म PDF Download करण्यासाठी लिंक प्रदान करू, जेणेकरून आपण हे EWS Certificate फार्म ची पीडीएफ सहज डाऊनलोड करू शकता.

EWS Certificate From Download करण्यासाठी येथे क्लिक करा.