बोनाफाईड प्रमाणपत्र नमुना अर्ज मराठी | Bonafide Certificate Meaning in Marathi PDF

बोनाफाईड साठी अर्ज मराठी

नमस्कार मित्रांनो, जर तुम्ही Bonafide Certificate Meaning in Marathi? बद्दल माहिती जाणून घेणार असाल. तर आम्ही या लेखाद्वारे बोनाफाईड म्हणजे काय? आणि बोनाफाईड प्रमाणपत्र मिळण्यासाठी काही अर्जाचे नमुने पाहणार आहोत.

बोनाफाईड प्रमाणपत्र म्हणजे काय?

बोनाफाईड प्रमाणपत्र म्हणजे एका ते विशिष्ट व्यक्ती त्या संस्थेची संबंधित असल्याचे प्रमाणित करण्यासाठी संस्थेद्वारे जारी केलेले प्रमाणपत्र म्हणजे बोनाफाईड प्रमाणपत्र होय. सहसा शैक्षणिक संस्था त्यांच्या विद्यार्थ्यांना हे प्रमाणपत्र देतात. कंपन्या त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठीही असे करू बोला काय बोनाफाईड प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी संस्था किंवा संस्थेच्या प्रमुखाकडे लेखी अर्ज करावा लागतो. शालेय विद्यार्थ्यांसाठी बोनाफळ प्रमाणपत्र हे अनेक महत्त्वाच्या कामासाठी गरजेचे असत जे की खाली दिलेले आहे.

  • एसटी बस मासिक पास काढण्यासाठी.
  • मतदान यादी मध्ये नाव नोंदणीसाठी.
  • आता कार्ड वरील माहिती अपडेट करण्यासाठी.
  • बँकेमध्ये नवीन खाते उघडण्यासाठी.
  • राज्य सरकारच्या स्कॉलरशिप फॉर्म भरण्यासाठी.
  • जातप्रमाणपत्र काढण्यासाठी.

Application For Bonafide Certificate in Marathi

खाली आपण बोनाफाईड प्रमाणपत्र मिळवण्यासाठी अर्ज प्राचार्य किंवा मुख्याध्यापकांना कसा लिहायचा याचे नमुने पाहणार आहोत. बोनाफाईड सर्टिफिकेट च्या अर्ज मध्ये विद्यार्थ्यांना शाळेचे नाव किंवा महाविद्यालयाचे नाव, दिनांक अर्जदाराची संपूर्ण नाव, कोणत्या वर्गात शिकत आहे, आणि शैक्षणिक वर्ष, रोल नंबर याचा स्पष्टपणे उल्लेख करावा लागतो.

बोनाफाईड अर्ज नमुना मराठी १

दिनांक

प्रति,

मा. मुख्याध्यापक/प्राचार्यसाहेब.

शाळेचे महाविद्यालयाचे नाव.

पत्ता

विषय – बोनाफाईड सर्टिफिकेट (सत्यप्रमाणपत्र) मिळणेबाबत.

अर्जदार:- (अर्जदाराचे नाव)

महोदय,

वरील विषयास अनुसरून विनंती अर्ज सादर करतो/करते की, मी आपल्या शाळेत महाविद्यालयात सन ___ या शैक्षणिक वर्षात इयत्ता ___ मध्ये शिकत असून माझा रोल नंबर हा आहे मला माझ्या वैयक्तिक कामानिमित्त बोनफळ सर्टिफिकेटची गरज आहे कृपया मला सदर प्रमाणपत्र लवकरात लवकर उपकृत करावे ही नम्र विनंती. धन्यवाद,

आपला आज्ञाधारक विद्यार्थी,

(नाव व सही)

Bonafide Certificate in Marathi PDF

तर मित्रांनो, वर तुम्ही समजून घेतला असेल की बोनाफाईड प्रमाणपत्रासाठी अर्ज कसा करायचे आणि त्यासाठी लागणारे अर्ज कसा लिहावा. अजून काही अर्जाची नमुने आम्ही पीडीएफ स्वरूपात दिले आहेत तर तुम्ही खाली दिलेल्या डाउनलोड या बटनवर क्लिक करून डाऊनलोड करू शकता.

Conclusion

या लेखाद्वारे आम्ही आपणास बोनाफाईड सर्टिफिकेट म्हणजे काय? बोनाफाईड प्रमाणपत्र कुठे आवश्यक आहे? बोनाफाईड सर्टिफिकेट अर्ज नमुना याबद्दल सर्व आवश्यक माहिती सामायिक केली गेली आहे. समजा जर तुम्हाला या विषयाबद्दल अधिक प्रश्न असतील तर तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता.