भारतीय अर्थव्यवस्था मराठी PDF – Bhartiya Arthvyavastha in Marathi PDF

Indian Economy in Marathi

Bhartiya Arthvyavastha in Marathi: – नमस्कार मित्रांनो, आज आपण या लेखांमधून भारतीय अर्थव्यवस्था या विषयाबद्दल माहिती मराठीमध्ये जाणून घेणार आहोत.

अर्थव्यवस्था म्हणजे काय? (What is Economy in Marathi)

आधुनिक अर्थव्यवस्थांचा स्वरूप अत्यंत गुंतागुंतीचे असले तरी उत्पादन (Production), विभाजन (Distribution), विनिमय (Exchange) आणि उपभोग (Consumption) या चार प्रकारच्या व्यवहारांना ‘आर्थिक व्यवहार’ (Economic Activities) असे म्हटले जाते. म्हणूनच या चार व्यवहाराशी संबंधित असलेल्या संस्था, संघटना यांच्या एकत्रीकरणातून जी व्यवस्था निर्माण होते त्याला अर्थव्यवस्था (Economy) असे म्हणतात. त्यावरून आपण एखाद्या गावाच्या, शहराच्या, जिल्ह्याच्या, राज्याच्या, देशाच्या तसेच संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेची कल्पना करू शकतो. अर्थात, वेगवेगळ्या देशात वेगळा अर्थ व्यवस्था दिसतात. त्या त्या देशातील नैसर्गिक, सामाजिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक, राजकीय वातावरणातून अर्थव्यवस्थेच्या कार्यपद्धतीत फरक निर्माण होतो. तसेच अर्थ व्यवस्थापनामध्ये कालिका दृष्ट्या सुद्धा बदलतात होतात.

अर्थव्यवस्थाचे प्रकार (Types of Economies)

अर्थव्यवस्था यांचे वर्गीकरण दोन दशकांच्या आधारावर केले जाते.

  1. उत्पादन साधनांची मालकी नुसार
  2. विकासाच्या अवस्थेनुसार

उत्पादन साधनाच्या मालकिन नुसार अर्थव्यवस्थाचे प्रकार

भूमी, श्रम, भांडवल व उद्योजकता त्यांच्या उत्पादनाची साधने असे म्हटले जाते. अर्थव्यवस्थेत ती साधने कोणाच्या मालकीचे आहे त्या आधारावर अर्थव्यवस्था यांचे तीन प्रकार केले जातात

  • भांडवलशाही अर्थव्यवस्था
  • समाजवादी अर्थव्यवस्था
  • मिश्र अर्थव्यवस्था

भांडवलशाही अर्थव्यवस्था (Capitalistic Economy)

ज्या अर्थव्यवस्थेत उत्पादनाची साधने खाजगी मालकीची असतात, वस्तू व सेवांची उत्पादन खासगी भांडवल द्वारा मार्फत होते व त्यांच्या किंमती बाजार यंत्रणेत ठरवतत अशा अर्थव्यवस्थेला भांडवलशाही अर्थव्यवस्था असे म्हणतात.

समाजवादी अर्थव्यवस्था (Socialistic Economy)

ज्या अर्थव्यवस्थेत उत्पादनाची साधने सरकारी/सार्वजनिक मालकीची असतात आणि वस्तू व सेवांची उत्पादन व विभाजन सरकार मार्फत चालते अशा अर्थव्यवस्थेला समाजवादी अर्थव्यवस्था असे म्हणतात.

मिश्र/संमिश्र अर्थव्यवस्था (Mixed Economy)

भांडवलशाही आणि समाजवाद या दोन्ही अर्थ प्रणालीमधील दोष टाळून चांगल्या गुणांचा समन्वय साधण्याचा प्रयत्न करणाऱ्या अर्थव्यवस्थेला मिश्र अर्थव्यवस्था असे म्हणतात. मिश्र अर्थव्यवस्थेत सार्वजनिक व खासगी क्षेत्राचे सह अस्तित्व असते. मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये वस्तू व सेवा यांचे उत्पादन कार्य सरकार तसेच खाजगी क्षेत्र मार्फत घडवून आणले जाते. काही वस्तू सेवांच्या उत्पादनावर सरकारची पूर्ण मक्तेदारी असू शकते. भारताने स्वातंत्र्यानंतर मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार करून आर्थिक नियोजनाच्या माध्यमातून आर्थिक विकासाची प्रक्रिया सुरू केली. अर्थात भारताच्या मिश्र अर्थव्यवस्थेचा आराखडा मूलतः भांडवलशाही वर आधारलेली होती. 1991 च्या आर्थिक सुधारणा पासून मात्र भारतीय अर्थव्यवस्थेवर हा प्रवास मिश्र अर्थव्यवस्था कडून मुक्त अर्थव्यवस्था कडे होत आहे.

मालकी नुसार अर्थव्यवस्थेची क्षेत्रे

मालकी नुसार अर्थव्यवस्थेमध्ये पुढील चार क्षेत्रे आढळून येतात.

सार्वजनिक क्षेत्र (Public Sector)

सरकारी मालकी, व्यवस्थापन व नियंत्रणाखाली असलेल्या सर्व उद्योग उपक्रमांचा समावेश सर्व क्षेत्रात होतो. सार्वजनिक क्षेत्रात सरकार मार्फत चालविल्या जाणाऱ्या सर्व उद्योग उपक्रम येतात. उदाहरणार्थ: रेल्वे, शस्त्रास्त्रे, दूरदर्शन, पेट्रोलियम इत्यादी.

खाजगी क्षेत्र (Private Sector)

खाजगी क्षेत्र म्हणजे असे क्षेत्र तिच्यातील उद्योग व्यवसाय व खाजगी व्यक्ती किंवा व्यक्ती समूहाची मालकी व नियंत्रण असते. वैयक्तिक लाभ मिळवणे हे खाजगी क्षेत्राचे मूलभूत उद्दिष्ट असते. उदाहरणार्थ: कृषी व पूरक उद्योग लघु उद्योग घाऊक व किरकोळ व्यापार इत्यादी

संयुक्त क्षेत्र (Joint Sector)

या क्षेत्रात येणाऱ्या उद्योग व्यवसाय वर सरकारी तसेच खाजगी व्यक्ती किंवा व्यक्ती समूहाची संयुक्त मालकी, व्यवस्थापन व नियंत्रण असते.

सहकारी क्षेत्र (Corporative Sector)

या क्षेत्राचा काल तत्त्वावर स्थापन करण्यात आलेल्या संस्थाचा किंवा उद्योग यांचा समावेश होतो. सहकारी क्षेत्र हा खाजगी क्षेत्राचा एक उपप्रकार मानता येईल. सहकारात मालकी खाजगी ची पण व्यक्ती ऐवजी समूहाचे असते. भांडवलशाही व समाजवाद या दोन अर्थ प्रणालीचा सुवर्ण मध्ये सहकार होय. सहकाराचे वैशिष्ट्य हे की, सभासदाने आणलेले भांडवल कितीही असले तरी ‘एक सभासद एक मत’ या तत्वाने सहकारी संस्थांचा कारभार असत.